‘बाहेर पेपर लीक, आत वॉटर लीक’, नव्या संसद भवनाची अवस्था दाखवणारा VIDEO व्हायरल

बराच खर्च करुन नवीन संसद भवनाची इमारत बांधण्यात आली. पण या इमारतीची पावसामध्ये काय स्थिती आहे, ते दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यावर नेटीझन्स सरकारला मोठ्या प्रमाणात ट्रोल करतायत.

'बाहेर पेपर लीक, आत वॉटर लीक', नव्या संसद भवनाची अवस्था दाखवणारा VIDEO व्हायरल
water leakage in new parliament building
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 11:22 AM

तामिळनाडूच्या विरुधुनगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार मणिकम टॅगोर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होतोय. शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये संसदेच्या नव्या इमारतीला पावसामुळे गळती लागल्याच दिसतय. छतामधून पाणी गळती सुरु असल्याच व्हिडिओमध्ये दिसतय. टपकणाऱ्या पाण्यामुळे जमीन ओली होऊ नये, यासाठी जमिनीवर एक बादली ठेवण्यात आली आहे. “बाहेर पेपर लीकेज आणि आता वॉटर लीकेज. राष्ट्रपती वापरतात त्या संसद लॉबीमध्ये पाणी गळती. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षात ही स्थिती. या मुद्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार” असं या खासदराने टि्वटमध्ये म्हटलय. काँग्रेस नेत्याने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर युजर्स वेगवेगळे कमेंट करत आहेत.

समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या विषयी सोशल मीडियावर पोस्ट करुन टोमणा मारला आहे. “नव्या संसदेपेक्षा जुनी संसद चांगली होती. तिथे जुने संसद सदस्य येऊन भेटू शकत होते. अब्जो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नव्या संसदेत गळती सुरु आहे, तो पर्यंत जुन्या ससंसेत का जाऊ नये?” असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

रस्त्यांना तलावाच रुप

दिल्लीला काल पुन्हा मुसळधार पावसाचा फटका बसला. बुधवारी संध्याकाळी सुरु झालेला पाऊस रात्रभर कोसळला. त्यानंतर सरिता विहार, दरियागंज, प्रगति मैदान आणि आयटीओसह दिल्लीच्या अनेक भागांना तलावाच रुप आलं होतं. त्याचा परिणाम गुरुवारी सकाळी सुद्धा दिसून आला. आज सुद्धा दिल्लीतील काही भाग पाण्याखाली आहेत. गुरुवारी सकाळी सुद्धा अनेक भागात पाणी साचलेलं असल्याने गाड्या मंदगतीने धावत होत्या. पावसामुळे स्थित खराब असल्याने दिल्लीत आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काही कॉलेजेसही बंद राहतील.

'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे
'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे.
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री.
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?.
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?.
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले.
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.