West Bengal Assembly Election: ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावणार?; ‘या’ पाच मुद्द्यांवर भाजपची लढाई

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. (bjp trying to defeat mamata banerjee with these five political weapons)

West Bengal Assembly Election: ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावणार?; 'या' पाच मुद्द्यांवर भाजपची लढाई
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 12:02 PM

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी कारणांमुळे भाजपने बंगालमधील वातावरण ढवळून काढलं असलं तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने खास रणनीती तयार केली आहे. ममतादीदींना आव्हान देण्यासाठी भाजपने पाच मुद्दे तयार केले असून या पाच मुद्द्यांभोवतीच संपूर्ण निवडणूक केंद्रीत करण्याचा प्लान भाजपने तयार केला आहे. (bjp trying to defeat mamata banerjee with these five political weapons)

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून त्यापैकी 200 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं समोर ठेवलं आहे. ममता बॅनर्जी या गेल्या दहा वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपने मंत्र्यांची फौजच बंगालमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक मंत्र्यावर मोठी जबाबदारी देतानाच एकूण पाच मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरवण्याची रणनीतीही तयार करण्यात आली असून त्याचा घेतलेला हा आढावा.

हिंदुत्वाच्या माध्यमातून हिंदू मतांचं ध्रुवीकरण

गेल्या महिन्यात नोव्हेंबरच्या सुरुवातील अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पश्चिम बंगालला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण लढा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी चैतन्य महाप्रभू, स्वामी विवेकानंद यांचे गुणगाणही गायलं होतं. या दौऱ्यात त्यांनी दक्षिणेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. या प्राचीन मंदिराच्या गर्भगृहातही ते गेले होते. यावेळी त्यांचं शंख वाजवून स्वागत करण्यात आलं होतं. कालही ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी रामकृष्ण आश्रमद्वारे केली. तसेच अनेक मंदिरांमध्ये जाऊन पूजापाठ केला. शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये सॉफ्ट हिंदुत्वाची पेरणी सुरू केली असून निवडणुकीचा पारा जसा जसा चढेल तस तसे ते प्रखर हिंदुत्वाचा प्रचार करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये आरएसएसचं मोठं संघटन आहे. राज्यात 70 टक्के हिंदू मतदार आहेत. तर 27 टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे डाव्या विचारसरणीने भारलेल्या पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्वाच्या माध्यमातून हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यात येणार असून संपूर्ण प्रचार त्याभोवतीच केंद्रीत करण्याची रणनीतीही भाजपने तयार केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दलित-ओबीसींना आकर्षित करण्याचा प्रयत्न

राज्यात 70 टक्के हिंदू मतदार आहेत. त्यातील 34 टक्के मतदार केवळ अनुसूचित जाती आणि जमातीचे आहेत. त्यामुळे या दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत हा दलित मतदार आपल्याकडे खेचण्यात भाजपला काही प्रमाणात यशही आलं होतं. त्या आधी भाजपला 2011मध्ये केवळ 4 टक्के मते मिळाली होती. 2016मध्ये हा आकडा 17 टक्क्यावर पोहोचला होता. त्यामुळेच या निवडणुकीत दलित आणि ओबीसींना आपल्याकडे आकर्षित करण्यावर भाजपने भर दिला आहे. गेल्या दौऱ्याच्यावेळी शहा यांनी बांकुडा येथे जाऊन बिरसा मुंडा यांना अभिवादन करतानाच दलितांच्या घरी जाऊन जेवणही केलं होतं. कालही त्यांनी एका आदिवासी कुटुंबाच्या घरी जाऊन दुपारचं जेवण घेतलं होतं. पश्चिम बंगालमधील दलित आणि ओबीसी आपल्याकडे आकर्षित व्हावेत म्हणून त्यांनी पश्चिम बंगालमध्ये दलित आणि ओबीसी मंत्र्यांना प्रचारासाठी उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाराज, बंडखोरांना हेरण्याचा प्रयत्न

गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांच्या पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारीही ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज आहेत. या नाराजांना हेरून त्यांना पक्षात घेण्यावरही भाजपने भर दिला आहे. त्यापैकी टीएमसीचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत आमदार आणि नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. नाराज आणि बंडखोरांना पक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांना कमकुवत करण्यावरही भाजपने भर दिला आहे. (bjp trying to defeat mamata banerjee with these five political weapons)

दलित निर्वासितांवरील राजकारण

पश्चिम बंगालमधील दलित निर्वासितांचा मुद्दा उचलून भाजपने ममता बॅनर्जींना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दलित निर्वासितांना आपल्या बाजूने ओढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच मच्छिमार आणि मातुआ समुदायाच्या लोकांनाही आपल्याकडे आकर्षित करण्यावर भाजपने भर दिला आहे. बांगलादेशातून आलेल्या या दलित निर्वासितांचा राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघावर प्रभाव असून या मतदारांना आपल्याकडे खेचण्यावर भाजपने भर दिला आहे.

सरकारविरोधी रोष आणि कायदा सुव्यवस्था

ममता बॅनर्जी यांचं गेल्या दहा वर्षांपासून सरकार आहे. त्यामुळे येथील जनतेमध्ये सरकारविरोधात काही प्रमाणात रोष आहे. त्याचा फायदा उचलून मतांची बेगमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर हल्ला झाला होता. या माध्यमातून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही या निवडणुकीचा मुख्य मुद्दा करून ममता बॅनर्जी यांना घेरण्याच्या प्रयत्नातही भाजप आहे. त्यामुळे आगामी काळात ममता बॅनर्जींना मोठ्या आव्हानाला सामोरे जावं लागणार आहे. (bjp trying to defeat mamata banerjee with these five political weapons)

संबंधित बातम्या:

शाहांची सभा संपली आणि भाजप कार्यकर्त्यांवर कोण तुटून पडलं? बंगालमध्ये राडा

बंगालमध्ये मोठमोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश, अमित शाहांचा ममता दीदींवर निशाणा, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

ममतांच्या आमदारांची फोडाफोडी, मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी, भाजपचं ‘मिशन बंगाल’ नेमकं काय?

(bjp trying to defeat mamata banerjee with these five political weapons)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.