
आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता कायम डॉलर आणि रुपयाची तुलना केली जाते. कारण यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं मूल्य अधोरेखित होत असतं. गेल्या काही वर्षात रुपयाचं सातत्याने अवमूल्यन होत आहे. पण भारतीय रुपयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 90 पेक्षा जास्त रुपयांनी घसरली. त्यामुळे भारतीय बाजारात खळबळ उडाली आहे. कारण त्याचे परिणाम भविष्यात काय होऊ शकतात याची जाणीव आहे. हा फक्त एक आकडा नाही तर येणाऱ्या काही महिन्यात तुमच्या खिशावर काय परिणाम होईल याचे संकेत देत आहे. भविष्यात एक डॉलरची किंमत 100च्या पार जाणार का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. रुपया आणि डॉलरची किंमत कशी ठरते? डॉलर आणि रुपयात इतका फरक का? सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील. डॉलर आणि रुपयात फरक कसा दिसून येतो? डॉलर आणि रुपया महाग स्वस्त झाला हे कसं कळतं? त्याचं उदाहरण द्यायचं तर तुम्ही बाजारात गेलात आणि तुम्हाला...