AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT 2024 : मुलांना जन्म देताना महिलांना ज्या वेदना होतात त्याची किंमत कोण सांगेल?; स्मृती ईराणी यांचा सवाल

महिला नेतृत्व असलेल्या विकासाची चर्चा करण्याची गजर आहे. स्त्रिया घरात काम करतात. कुणाची तरी आई घरात काम करते. कुणाची तरी पत्नी घरात काम करते. त्यांच्या कामाची कुठेच नोंद होत नाही. स्त्रिया नऊ महिने त्यांच्या पोटात मुलाला वागवते. मुलाला जन्म देताना महिलांना ज्या पीडा होतात, वेदना होतात, त्याची किंमत कोण करणार? असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केला.

WITT 2024 : मुलांना जन्म देताना महिलांना ज्या वेदना होतात त्याची किंमत कोण सांगेल?; स्मृती ईराणी यांचा सवाल
Smriti IraniImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 26, 2024 | 4:41 PM
Share

नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : व्हॉट्स इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट सुरू झालेली आहे. कालपासून या समीटमध्ये विविध विषयावर मंथन सुरू आहे. देशाच्या आर्थिक विकासापासून ते एआयएच्या दस्तकपर्यंतच्या विषयावर मंथन सुरू आहे. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. राजकारणापासून ते मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. देशातील बड्या हस्तींनी तर या कार्यक्रमात हजेरी लावलीच पण विदेशातील दिग्गजांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी नारी शक्ती विकसित भारत या विषयावर आपलं मत मांडलं. भारताच्या स्वातंत्र्यात महिलांचं योगदान मोठं आहे, असं सांगतानाच स्मृती ईराणी यांनी राणी लक्ष्मीबाईंचं उदाहरण दिलं. राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला पाठीला बांधून इंग्रजांविरोधात दोन हात केल्याचंही स्मृती ईराणी यांनी आवर्जुन सांगितलं.

त्याची किंमत कोण सांगेल?

स्मृती ईराणी यांनी यावेळी लैंगिक समानतेवरही भाष्य केलं. मुलांना जन्म देताना महिलांना ज्या वेदना होतात त्याची किंमत कोण सांगेल?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. सहा महिन्यांची मॅटर्निटी लिव असेल, महिला आरक्षण बिल असेल… याबाबत स्मृती ईराणी यांना विचारण्यात आलं. यावेळी त्यांच्या राजकीय प्रवासावरही विचारण्यात आलं. तसेच तुम्ही अनेकांच्या रोल मॉडल आहात, असंही सांगण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं.

आपण केवळ महिलांच्या समस्या उजागर करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधी तुम्ही दुसऱ्या पुरुषांसाठी काय केलं? असा सवाल पुरुषांना करत नाही. महिला जेव्हा काहीही करतात तेव्हा तुम्हीच आमची प्रेरणा आहात असं सांगितलं जातं. पण एखादा पुरुषही दुसऱ्या पुरुषाची प्रेरणा असू शकतो ना. आपण केवळ आपल्या जेंडरचं बर्डन घेऊन वावरत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

महिला तसूभर कमी नाहीत

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पीएम मोदींनी महिलांना एक वेगळी ओळख आणि बळ दिलं आहे. त्यांनी महिलांना अर्थव्यवस्थेचा बरोबरीचा भागीदार मानलं आहे. 90 मिलियन महिलांना सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडलं आहे. आज भारतातील महिला कुणापेक्षाही तसूभरही कमी नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

अशी लढाई कुणी लढलीय का?

नारीशक्तीवर बोलताना त्यांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख केला. स्वातंत्र्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यांनी आपल्या मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांच्या विरोधात लढाई लढली होती. जगातील कोणत्याही देशात एखाद्या महिलेने स्वातंत्र्यासाठी अशी लढत दिली होती काय? म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासासोबत वारशावरही जोर देऊन बोलत असतात असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं