WITT 2024 : ‘ॲनिमल’च्या यशाचं आश्चर्य वाटतंय; खुशबू सुंदर असं का म्हणाल्या?
टीव्ही9 नेटवर्कने राजधानी दिल्लीत मेगा इव्हेंट व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं आयोजन केलं आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रीडा जगतातील दिग्गज, उद्योग जगतातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील नामवंत सामील झाले होते.

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : आईची परिस्थिती मी पाहिली. तेव्हाच ठरवलं की अबला नारी बनायचं नाही. माझ्या वडिलांनी आईला वाईट वागणूक दिली. ते माझ्या डोळ्यासमोर होतं. त्यामुळेच मी अबला नारी बनायचं नाही हे ठरवलं. माझ्यासारखी माझी मुलगी पुढे पुढे करणारी बनू नये असं माझ्या आईलाही वाटायचं, असं प्रसिद्ध अभिनेत्री आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर याांनी सांगितलं. टीव्ही 9 नेटवर्कने आयोजित केलेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी हे मत मांडलं. यावेळी स्टिफ्टंग जुगेंडौस्टौश बायर्नच्या संचालक मरिजम ऐसले, ब्रोसिया, डर्टमुंडचे फुटबॉल इवागेलिस्ट जुलिया फर आणि गेलचे संचालक (एचआर) आयुष गुप्ता यांनी स्त्रीयांना कशा पद्धतीने मुख्यप्रवाहात आणता येईल यावर भाष्य केलं.
खुशबु सुंदर यांनी यावेळी तामिळ शिकण्याचा किस्साही ऐकवला. माझे लाईटमन, कॅमेरा पर्सन आणि सेटवरील लोकांनी मला तामिळ शिकण्यास मदत केली. मी मुंबईतून आले आणि तामिळनाडूत घर बांधलं. माझ्या सहकाऱ्यांनीच मला तामिळ बोलण्यास प्रोत्साहित केलं, असं खुशबू सुंदर यांनी सांगितलं.
ॲनिमलच्या यशाचं आश्चर्य
ॲनिमल सिनेमाचं यश आश्चर्यकारक आहे. लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीला आम्ही काय बोलू शकतो? ॲनिमल सारखा चित्रपट लोक वारंवार पाहत आहेत. सिनेमा पाहणाऱ्यांची मानसिकता ही एक समस्या आहे. सिननेमात जे दाखवलं जात आहे, तेच वास्तव समाजात घडत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महिलांकडून प्रेरणा मिळतेय
गेलचे डायरेक्टर आयुष गुप्ता यांनीही यावेळी आपलं मत मांडलं. आजच्या काळात महिला एकमेकींना प्रेरित करत आहे आणि लोकांना पुढे आणत आहे, असं गुप्ता यांनी सांगितलं. तर, मरिजम ऐसले आणि जुलिया फर यांनीही महिलांना मुख्यप्रवाहात कसं आणलं जाईल आणि महिलांना कसं सशक्त करता येईल यावर भाष्य केलं.
टीव्ही9 नेटवर्कने राजधानी दिल्लीत मेगा इव्हेंट व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं आयोजन केलं आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रीडा जगतातील दिग्गज, उद्योग जगतातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील नामवंत सामील झाले होते. आज 25 फेब्रुवारी रोजी हा सोहळा पार पडला. तीन दिवस चालणारा हा विचारांचा उत्सव 27 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या सोहळ्याला मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मोदी देशाला उद्देशून काय भाष्य करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
