AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता चौथ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व करणार भारत; पंतप्रधान मोदींनी असा भरला हुंकार

What India Thinks Today | सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अगोदरच व्यक्त केला आहे. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व मोदी सरकार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकारचे व्हिजनचं त्यांनी मांडले. TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दमदार भाषणाने सर्वांना भुरळ घातली.

आता चौथ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व करणार भारत; पंतप्रधान मोदींनी असा भरला हुंकार
| Edited By: Harish Malusare | Updated on: Feb 26, 2024 | 10:52 PM
Share

नवी दिल्ली | 26 February 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या दिवशी चार चांद लावले. त्यांच्या उत्साहपूर्ण, आवेशपूर्ण भाषणाने एकच जोश भरला. पंतप्रधानांनी चौफेर फटकेबाजी केली. काँग्रेसला चिमटे काढतानाच, भविष्यातील मोदी सरकारचा रोडमॅपही त्यांनी दाखवला. भारताच्या विकासाचे चाक जोमाने फिरत आहे. भारत हा जगाचा केंद्रबिंदू कसा ठरत आहे. त्यामागची कारणमीमांसा त्यांनी केली. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व मोदी सरकार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींचा विकासाचा रोडमॅप

  • आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत मागे राहिलो. आपल्याला आता चौथ्या औद्योगिक क्रांतीत जगाचं नेतृत्व करायचं आहे. भारतात रोज दोन नवे कॉलेज उघडले आहे, प्रत्येक आठवड्यााला एक विद्यापीठ उघडल्यांचं त्यांनी सांगितले.
  • भारतात रोज ३६नवे स्टार्टप बनले आहेत. भारतात रोज १६ हजार कोटी रुपयांचे यूएआय ट्रान्जेक्शन झालं आहे. भारतात रोज १४ किलोमीटर रेल्वे ट्रॅकचं निर्माण झालं आहे. भारतात रोज ५हजार हून अधिक एलपीजी गॅस कनेक्शन दिलं गेलं आहे, भारतात प्रत्येक सेकंदाला एका नळातून कनेक्शन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  • भारतात रोज ७५ हजार लोकांना गरीबीतून बाहेर काढलं आहे. आपण नेहमीच गरिबी हटावचे नारे ऐकले. दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर येतील याचा कुणी विचार केला होता. पण हे झालं आहे. आमच्याच सरकारमध्ये झाल्यांचे ते म्हणाले.

गरिबी सिंगल डिजिट

भारतात कन्झम्प्शनबाबतचा रिपोर्ट आला आहे. त्यातून नवा ट्रेंड कळतो. भारतातील गरिबी आता सिंगल डिजीटला आली आहे. या डेटा नुसार कन्झम्प्शन अडीच टक्के वाढलं आहे. गेल्या दहा वर्षात गावात कन्झम्प्शन अधिक वाढलं आहे. म्हणजे गावातील लोकांचं आर्थिक सामर्थ वाढत आहे. हे असंच झालं नाही. २०१४ नंतर आम्चया सरकारने गावाला समोर ठेवून इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं. महिलांचं उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केला. विकासाच्या या मॉडेलमुळे भारत सशक्त झाला आहे.

कुटुंबांची क्रयशक्ती वाढली

पूर्वी ज्या कुटुंबाची संपूर्ण शक्ती अन्न मिळवण्यात जात होती. आज त्यांचे सदस्य सर्व वस्तूंवर पैसे खर्च करत आहेत. पूर्वीचे सरकार देशातील जनतेला अभावात ठेवायचे. अभावत राहिलेल्या लोकांना निवडणुकीत थोडंफार द्यायचे. त्यातून व्होट बँकचं राजकारण सुरू झालं. जे मतदान करायचे त्यांच्यासाठीच सरकार काम करत होते. आम्ही हा माइंडसेट सोडला. आम्ही विकासाचा लाभ सर्वांना समान द्यावा हे ठरवलं. आम्ही तुष्टीकरण केलं नाही. आम्ही देशावासियांच्या संतुष्टीकरणाचा मार्ग निवडला. गेल्या १० वर्षातील आमचा हाच एक मंत्र आहे, हाच आमचा विचार आहे. आम्ही वोट बँक पॉलिटिक्सला पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्समध्ये बदल्याचे त्यांनी सांगितले.

युपीआयसह विज्ञानाचा झेंडा

भारत आज ग्लोबल वर्ल्डमध्ये डिजीटल पेमेंट करणारा सर्वात मोठी ताकद आहे. भारत चंद्रमाच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश आहे, फायजीमध्ये युरोपलाही मागे टाकलं आहे. आज भारत उज्वल भविष्यासाठी मेहनत करत आहे. भारत भविष्याकडे पाहत आहे. म्हणूच लोक म्हणत आहेत इंडिया इज फ्युचर. त्यामुळे येणारे पाच वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आपल्याला भारताच्या सामर्थ्याला नव्या उंचीवर न्यायचं आहे. विकसीत भारताची प्रगती करायची आहे. हे प्रगती आणि प्रशस्तीचं काम आहे. तुम्ही बिग लीपचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळे मलाही माझी लीप उघडायला संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं