AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय आहे फॉर्म 6? न्यायालयाच्या टिपणीमुळे ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? राहुल गांधींनी काय केले आरोप? वाचा

मोठी बातमी समोर येत आहे, एसआयआर वादावर सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली आहे. आम्ही सुधारित फॉर्म 6 ला मान्यता दिली नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे, त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे फॉर्म 6? न्यायालयाच्या टिपणीमुळे ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? राहुल गांधींनी काय केले आरोप? वाचा
rahul gndhiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 6:38 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, एसआयआर वादावर सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली आहे. आम्ही सुधारित फॉर्म 6 ला मान्यता दिली नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्याचसोबत रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश देखील न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिपणीमुळे आता निवडणूक आयोगाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निवडणूक आयोगाने 26 सप्टेंबर रोजी असं म्हटलं होतं की, काही राज्यांमध्ये घेण्यात येत असलेल्या विशेष निवडणूक प्रक्रियेसाठी ऑनलाईन फॉर्म 6 सोबत जोडलेल्या नवीन घोषणापत्राला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. मात्र आता न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, आम्ही सुधारित फॉर्म 6 ला मान्यता दिलेली नाहीये, त्याचसोबत रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत, त्यामुळे आता ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींचा हल्लाबोल

दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या टिपणीनंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘ज्ञानेश कुमार यांनी बेकायदेशीरपणे आणि एकतर्फी फॉर्म 6 मध्ये बदल केला हे आता नि:संशय सिद्ध झालंय. भाजपला मदत करण्यासाठी ज्ञानेश कुमारांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. लोकशाहीवरच्या गुन्हेगारी हल्ल्यात सहभागी असलेल्या ज्ञानेश कुमार आणि इतर सर्वांना यासाठी जबाबदार धरले जाईल, असं राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे. दरम्यान यासोबतच राहुल गांधींनी निवडणूक आयोगाने यासंदर्भात जी प्रेस नोट काढली होती, ती देखील सोबत जोडली आहे. या प्रेस नोटमध्ये निवडणूक आयोगाकडून फॉर्म 6 सोबतच्या घोषणापत्रासाठी सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे आता कोर्टाच्या या टिपनीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे फॉर्म 6

मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी फॉर्म 6 चा वापर केला जातो. मात्र त्यामध्ये निवडणूक आयोगाकडून बदल करण्यात आला होता. तसेच या बदलाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याचं देखील निवडणूक आयोगाने म्हटलं होतं. मात्र आता आम्ही सुधारित फॉर्म 6 ला मान्यता दिली नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. यावरून विरोधी पक्ष आता सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत.

Follow Us
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी