AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला झेंडा नेमका कशाचा?

आंदोलकांनी लाल किल्ल्यावर एक वेगळा झेंडा फडकावला. त्यानंतर हा झेंडा कशाचा आहे आणि त्याचा इतिहास काय असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत.

Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला झेंडा नेमका कशाचा?
जुगराज सिंह
| Updated on: Jan 26, 2021 | 9:21 PM
Share

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमधील काही आंदोलक आज (26 जानेवारी) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यापैकी काही आंदोलकांनी थेट दिल्लीतील लाल किल्ल्यावर चढाई केली. या ठिकाणी या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर एक वेगळा झेंडा फडकावला. त्यानंतर हा झेंडा कशाचा आहे आणि त्याचा इतिहास काय असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्याचाच मागोवा घेणारा हा खास रिपोर्ट.

शेतकरी आंदोलनातील काही आक्रमक आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला झेंडा म्हणजे शिख संप्रदायाचा धार्मिक झेंडा ‘निशाण साहिब’ आहे. शिख धर्मात या झेंड्याला फार महत्त्व असून खूप पवित्र मानला जातो. हा त्रिकोणी आकाराचा झेंडा कॉटन कापड किंवा रेशमच्या कपड्यापासून तयार केला जातो. या झेंड्याच्या वरच्या भागात एक लटकनही असते. झेंड्याच्या मधोमध शिख धर्माचं पवित्र तलवारींचं चिन्ह असतं. त्याचा रंग निळा असतो.

हा निशाण साहिब ध्वज ज्या खांबावर फडकवला जातो त्यावर देखील वरच्या बाजूला दुधारी तलवार असते. या खांबावरील तलवारीचं वेगळं महत्त्व आहे. त्याचा अर्थ शिख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माचा व्यक्ती ईश्वराची आराधना करण्यासाठी धार्मिक स्थळात प्रवेश करण्यास स्वतंत्र आहे. निषाण साहिबला खालसा (शिख) धर्माचं परंपरागत चिन्ह/प्रतिक मानलं जातं. गुरुद्वाराच्या कळसावर किंवा उंचीच्या ठिकाणी फडकावल्याने ते लांबूनही सहज दिसते. निशाण साहिब शिख धर्माच्या अस्तित्वाचं प्रतिक आहे.

बैसाखीच्या मुहुर्तावर हा ध्वज खाली उतरवला जातो आणि दुधाने अभिषेक केला जातो. निशान साहिबचा नारंगी रंग फिका पडल्यानंतर तो बदलला जातो.

भारतीय सैन्यातील शिख सैनिकांकडूनही निशान साहिबचं ध्वजारोहन

निशान साहिब ध्वजाचं धार्मिक महत्त्व आणि पावित्र्य खूप असल्याने भारतीय सैन्यातील शिख सैनिकही आपआपल्या कामाच्या ठिकाणी हा ध्वज फडकावत असतात. यावरुनच आंदोलकाच्या समर्थकांकडून या ध्वजाच्या बदनामीवर टीका होतेय.

निशान साहिबचा इतिहास काय?

निशान साहिब झेंडा आधी लाल रंगाचा असतो असंही सांगितलं जातं. नंतर त्याचा रंग बदलून पांढरा केला जातो. काही काळाने त्याचा रंग नारंगी करण्यात आला. 1709 मध्ये सर्वात आधी गुरु हरगोविंद यांनी अकाल तख्तवर केसरी रंगाचा निशान साहिब फडकावला होता. सध्या निहंगकडून चालवल्या जाणाऱ्या गुरुद्वारांवर निशान साहिब झेंड्याचा रंग निळा असतो.

संबंधित बातम्या :

Fact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का? तथ्य काय?

हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य, इतकं निर्लज्जपणे कसं बोलू शकतो, भाई जगताप कडाडले

‘केंद्र सरकारनं नाटकबाजी थांबवावी’, राजू शेट्टींचा हल्लाबोल, छगन भूजबळही आक्रमक

संबंधित व्हिडीओ :

What is history of Nishan Sahib flag hoisted at Red fort during Delhi Farmer tractor rally

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.