काँग्रेस, आप आणि एमआयएम एकत्रित लढले असते तर गुजरातचं चित्रं काय असतं?; गुजरात फाईल काय सांगत्ये?

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Dec 09, 2022 | 2:18 PM

भाजपने गुजरातमध्ये एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नव्हतं. काँग्रेसने सहा मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं. आपने तीन तर एमआयएमने 13 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं.

काँग्रेस, आप आणि एमआयएम एकत्रित लढले असते तर गुजरातचं चित्रं काय असतं?; गुजरात फाईल काय सांगत्ये?
काँग्रेस, आप आणि एमआयएम एकत्रित लढले असते तर गुजरातचं चित्रं काय असतं?
Image Credit source: tv9 marathi

अहमदाबाद: गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 182 पैकी 156 जागांवर भाजपने न भूतो न भविष्यती असा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला केवळ 17 आणि आम आदमी पार्टीला फक्त पाच जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या पराभवाला ओवैसी यांची एमआयएम आणि अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी असल्याचं सांगितलं जात आहे. जर गुजरातमध्ये काँग्रेस, एमआयएम आणि आप एकत्र आले असते तर राज्याचं चित्रं काय असतं? यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये भाजपला 52.5 टक्के मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला 27.3 टक्के मते मिळाली आहेत. आम आदमी पार्टीला 12.3 आणि एमआयएमला 0.29 टक्के मते मिळाली आहेत. या तिन्ही पक्षाची मते एकत्रित केली तर ती 40.49 टक्के होतात. भाजपची एकूण मते 52.5 टक्के आहे. आकडेवारीत तिन्ही पक्षांपेक्षा भाजपची टक्केवारी अधिक दिसत असली तरी या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढली असती तर भाजपची टक्केवारी घटली असती. कारण अनेक मतदारसंघात या तिन्ही पक्षांनी एकमेकांचीच मते खाल्ली आहेत. भाजपची मते ओढलेली नाहीत.

या निवडमुकीत एमआयएमने काँग्रेसची मुस्लिम मते आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं आहे. तर आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या आदिवासी मतांना सुरुंग लावला आहे. गुजरातमधील मुसलमान नेहमीच काँग्रेससोबत राहिला आहे. गोध्रानंतर तर मुस्लिम मतदार कायम काँग्रेससोबतच राहिला. पण एमआयएमच्या एन्ट्रीनंतर काँग्रेसच्या या व्होट बँकला सुरुंग लागला आहे. त्यामुळे मतविभागणी झाल्याने भाजपचं फावलं.

भाजपने गुजरातमध्ये एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नव्हतं. काँग्रेसने सहा मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं. आपने तीन तर एमआयएमने 13 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत एमआयएमचा एकही उमेदवार निवडून लाना ही. तर आपचे पाच उमेदवार निवडून आले आहेत.

अनेक मतदारसंघात केवळ एमआयएम आणि आपमुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. जर या ठिकाणी आप आणि एमआयएम नसती तर काँग्रेसचा सहज विजय झाला असता.

आम आदमी पार्टीमुळे काँग्रेसला 30 जागांवर नुकसान झालं आहे. 30 जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. या ठिकाणी आपने मते खाल्ल्याने काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर राहावं लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

जाणकारांच्या मते काँग्रेस, एमआयएम आणि आप एकत्र लढले असते  किंवा आप आणि एमआयएमने गुजरातची निवडणूक लढली नसती तर काँग्रेसला 80च्या जवळपास जागा मिळाल्या असता. भाजपलाही 100च्या खालीच रोखता येऊ शकलं असतं. कदाचित राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली असती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI