शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ शिकवल्यानंतर समोर आली बलात्काराची घटना, 3 अल्पवयीन मुलींनी सांगितलं भयानक वास्तव

या प्रकरणात, बलात्काराची घटना तेव्हा समोर आली जेव्हा चिमुकलीला शिक्षकांनी गुड टच आणि बॅड टचमधला फरक शिकवला.

शाळेत 'गुड टच, बॅड टच' शिकवल्यानंतर समोर आली बलात्काराची घटना, 3 अल्पवयीन मुलींनी सांगितलं भयानक वास्तव
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 12:28 PM

बडोदा : देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे. रोज म्हटलं तरी प्रत्येक शहरातून एक महिला अत्याचाराची घटना समोर येते. यातही अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाण जास्त आहे. आताही अशीच एक घटना समोर आली आहे, ज्याने प्रत्येक पालकाचे आणि शिक्षकांचे डोळे उघडतील. या प्रकरणात, बलात्काराची घटना तेव्हा समोर आली जेव्हा चिमुकलीला शिक्षकांनी गुड टच आणि बॅड टचमधला फरक शिकवला. (When teacher taught good touch bad touch then girls told about rape accused arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत शिक्षकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुड आणि बॅड टचमधला फरक शिकवला. यानंतर एका चिमुकलीनं माझ्यासोबत काका रोज असं करतात असं शिक्षकांना सांगितलं. त्यानंतर आणखी दोन मुलींनी आमच्यासोबतही असंच होतं असा खुलासा शिक्षकांसमोर केला. निरागस चिमुकल्यांच्या तोंडून हे ऐकल्यानंतर शिक्षकांच्या आणि पालकांच्या पायाखालची जमीनच हादरली.

हे प्रकरण गुजरातच्या बडोदा इथल्या मकरपुरा गावातलं आहे. इथे एकत्रच तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी काकाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शिक्षकांनी वर्गात गुड टच आणि बॅड टच शिकवल्यानंतर मुलींना त्यांच्यासोबत चुकीचं होत असल्याचं लक्षात आलं.

(When teacher taught good touch bad touch then girls told about rape accused arrested)

शिक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मुलींच्या कुटुंबियांना याबद्दल कल्पना दिली. यानंतर पोलिसांना पाचरण करण्यात आलं आणि आरोपी काकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेबाहेरील एक व्यक्ती रोज मुलींना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलवायचा आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा.

खरंतर, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मुलींवर अनेक दिवसांपासून अत्याचार होत होते. पण आपल्यासोबत नेमकं काय होत आहे, याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे आणि यावर आपल्या मुलींनाही शिकवलं पाहिजे. वाढते गुन्हे लक्षात घेता ही काळाची गरज आहे.

इतर बातम्या – 

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 5 आणि 10 रुपयांची नाणी विका, लखपती व्हा

देश पुन्हा हादरला, 9 नराधमांकडून 3 शहरांत तरुणीवर सामूहिक बलात्कार

(When teacher taught good touch bad touch then girls told about rape accused arrested)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.