AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देश पुन्हा हादरला, 9 नराधमांकडून 3 शहरांत तरुणीवर सामूहिक बलात्कार

तरुणीचं आधी अपहरण केलं आणि त्यानंतर 9 नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

देश पुन्हा हादरला, 9 नराधमांकडून 3 शहरांत तरुणीवर सामूहिक बलात्कार
| Edited By: | Updated on: Oct 07, 2020 | 10:44 AM
Share

राजस्थान : उत्तर प्रदेशच्या हाथरस इथं झालेल्या घटनेतून देश अजूनही बाहेर आलेला नाही. अशात पुन्हा एक हादरवून सोडणारी बलात्काराची घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला आहे. तरुणीचं आधी अपहरण केलं आणि त्यानंतर 9 नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (gang rape on 19 year old girl by 9 youths rajasthan news)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी तब्बल 8 दिवस पीडितेवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. ही घटना राजस्थानच्या चूरू जिल्ह्यातली (Churu District) आहे. आरोपींनी राजगड, जयपूर आणि नीमकाथाना या परिसरात तरुणीला डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केले. खरंतर, गेल्या काही दिवसांमध्ये राजस्थानमध्ये अनेक महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. नराधमांना पोलिसांचा धाक नसल्याची टीका जिल्ह्यातून होत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या मुद्द्यावर गहलोत सरकारवर निशाणा साधला आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्वीट करत जंगलराज सुरू असल्याची टीका केली आहे.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलिसांनी विक्रम पूनिया, देवेंद्र पूनिया, बंटी, राहुल, शुभम, हेमंत, मुकेश गुर्जर आणि आणखी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पीडिता सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (gang rape on 19 year old girl by 9 youths rajasthan news)

राजगडमधून केलं तरुणीचं अपहरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने राजगड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. ती 24 डिसेंबर रोजी राजगड बस स्थानकात उभी होती. यावेळी तिला विक्रम पूनिया भेटला. विक्रम आणि पीडितेची आधीपासूनच ओळख होती. विक्रमने तिला SSC फॉर्म भरण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं. कारमध्ये आधीच देवेंद्र पूनिया आणि आणखी दोन मुलं बसली होती. आरोपींनी पीडितेला राजगडमध्ये एका खोलीत बंद केलं आणि चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा अश्लील व्हिडीओदेखील शूट केला.

व्हिडीओ बनवून केलं ब्लॅकमेल पीडितेला जयपूरमधल्या हॉटेलमध्ये नेण्यात आलं. जिथे तिच्यावर अत्याचार करत तिला तोंड उघडलं तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेली. यानंतर पीडितेला नीमकाथाना इथल्या एका गावी नेलं. जिथं नराधमांनी वारंवार तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी 1 ऑक्टोबरला याच परिसरातून पीडितेला सोडवलं होतं आणि तिच्या कुटुंबियांकडे सोपवलं. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या – 

मोठी बातमी! नवी मुंबईतल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजे येणार नाहीत
झाडींमधून येत होता बाळाच्या रडण्याचा आवाज, जवळ जाताच गावकरी हादरले

(gang rape on 19 year old girl by 9 youths rajasthan news)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.