AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या

मे महिन्यात उष्णता इतकी वाढली की गेल्या अनेक वर्षातील रेकॉर्ड मोडले गेले आहेत. त्यातच मान्सून लवकर दाखल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केरळमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार आहे जाणून घ्या.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या
| Updated on: May 31, 2024 | 5:21 PM
Share

Monsoon : उन्हामुळे त्रस्त झालेले लोकं आता पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. उष्णतेमुळे लोकं हैराण झाली आहेत. त्यातच मान्सूनच्या बातमीने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण केरळमध्ये दरवर्षी पेक्षा यंदा २ दिवस आधीच मान्सूनचे स्वागत झाले आहे. साधारणपणे, मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. त्यानंतर 5 जूनपर्यंत तो ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पोहोचतो. भारतीय हवामान खात्याने (IMD) मान्सूनचा पहिला पाऊस 1 जून रोजी येईल असा अंदाज वर्तवला होता, परंतु 28 मे रोजीच केरळमध्ये पाऊस झाला. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी उष्णतेने कहर केला आहे. 11 वर्षांचा विक्रम यंदा मोडला गेला आहे. उत्तर भारतात तर तापमान ५० अंशांच्या वर गेले आहे. त्यामुळे संपूर्ण देश मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे.

मुंबईत कधी होणार पाऊस

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता 10 किंवा 11 जूनला मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा पहिला पाऊस मुंबई दाखल झाल्यानंतर येत्या ४ ते ५ दिवसात तो उर्वरित महाराष्ट्रात ( Maharashtra Weather Updates) पोहोचेल. त्यानंतर मग 27 जूनपर्यंत मान्सून देशाची राजधानी दिल्लीत दाखल होईल. दिल्लीत काल अचानक पाऊस झाला होता. येथे सर्वाधिक 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. बुधवारी दुपारी 2.30 वाजता दिल्लीतील मुंगेशपूर येथील हवामान केंद्रात 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मान्सून कधी आणि कुठे येतो

27 जूनपर्यंत मान्सून दिल्लीत दाखल झाल्यानंतर तो संपूर्ण भारत व्यापतो. मुंबईत 10-11 जूनच्या सुमारास मान्सूनचा पाऊस पडू शकतो. पश्चिम बंगाल सध्या रामल चक्रीवादळाच्या प्रभावातून सावरत आहे. 10 ते 29 जून दरम्यान येथे मान्सून अपेक्षित आहे. 13 किंवा 15 जूनपर्यंत मान्सून बंगळुरूमध्ये पोहोचेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 18 ते 20 जून दरम्यान उत्तर प्रदेशात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये 13 ते 18 जून दरम्यान मान्सूनचा पाऊस अपेक्षित आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १५ जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्रात पडण्यास सुरुवात होईल.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.