AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानतळावरून एकत्र ताब्यात घेतलं, पण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं; दिपके, दास आणि रांकांना पोलिसांनी नेमकं कुठं नेलं? मोठी माहिती समोर

Where Is Abhijeet Dipke and Two CJP Leaders: अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना ताब्यात घेऊन तीन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहे. त्यांच्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

विमानतळावरून एकत्र ताब्यात घेतलं, पण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं; दिपके, दास आणि रांकांना पोलिसांनी नेमकं कुठं नेलं? मोठी माहिती समोर
| Updated on: Oct 10, 2026 | 4:53 PM
Share

दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना विमानतळावर ताब्यात घेतले. यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे की, त्यांच्या अटकेनंतर या आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार? मात्र, अभिजीत दीपकेने स्वतःच एका व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, आमच्यानंतर अजिंक्य या आंदोलनाचे नेतृत्व करेल. मात्र आता यानंतर असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी कुठे नेले आहे? याबद्दल आता मोठी माहिती समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेतले आहे. विमान विमानतळावर येताच दिल्ली पोलीस विमानात घुसले. त्यानंतर सीजेपीच्या या तिन्ही नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आल्याचे समोर आले आहे. याआधी प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीला गुरुग्राममधील त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते.

सीजेपीच्या तीन नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेले आहे. अभिजीत दीपक यांना गुरुग्राममध्ये, आशुतोष रांका यांना द्वारका येथे आणि सौरभ दास यांना दिल्लीत ताब्यात घेण्यात आले आहे. तर युट्युबर ध्रुव राठीला गुरुग्राममधील क्राईम ब्रांच सेक्टर ३९ कार्यालयात ताब्यात घेण्यात आले. ध्रुव राठीला सकाळी केंद्रीय विहारच्या सेक्टर ५६ मधून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे.

कॉकरोच जनता पक्षाचे संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांना आंदोलनाची सूत्रे हाती घेतली आहेत. यानंतर आता कॉकरोच जनता पक्षाचे संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना एक संदेश दिला आहे. ते म्हणाले की, आम्ही सर्वांना जंतर मंतरकडे मोर्चा काढण्याचे आवाहन करत आहोत. जर दिल्ली पोलिसांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर ते तुम्हाला जिथे थांबवतील, तेच तुमचे जंतर मंतर असेल.

Follow Us
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा