AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील अनोख गाव, 700 घरं अन् 100 मुख्याध्यापक, प्रत्येक घरात दोन-दोन शिक्षक, कुठे आहे हे गाव?

भारतातील असं एक गाव जिथे 700 घरांमध्ये आहेत 100 मुख्याध्यापक तर अनेक घरांमध्ये आहेत दोन-दोन शिक्षक. या गावाला शिक्षकांची फॅक्टरी म्हणून ओळखले जाते. कुठे आहे हे गाव?

भारतातील अनोख गाव, 700 घरं अन् 100 मुख्याध्यापक, प्रत्येक घरात दोन-दोन शिक्षक, कुठे आहे हे गाव?
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 22, 2026 | 12:34 PM
Share

भारतात अनेक गांव आहेत, जी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध असतात. मात्र, उत्तर प्रदेश मधील एका गावाने शिक्षणाच्या बळावर वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या गावात तब्बल 700 घरांपैकी 400 हून अधिक लोक शिक्षक आहेत तर 100 पेक्षा जास्त जण मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे या गावाला अभिमानाने ‘मास्टरांचे गाव’ किंवा ‘शिक्षकांची फॅक्टरी’ असे म्हटले जाते.

हे विशेष गाव म्हणजे सांखनी, जे बुलंदशहर जिल्ह्यात आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात या गावाने एक अनोखी परंपरा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, येथे मुलीही शिक्षणात मोठी प्रगती करत असून अनेक महिला सरकारी शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहेत. काहींनी इतर क्षेत्रांतही यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केलं आहे. गावातील एका विद्यार्थिनीने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत राज्यात अव्वल स्थान मिळवून राज्यपालांकडून सन्मानही मिळवला होता.

अनेक कुटुंबांमध्ये दोन-दोन जण शिक्षण

या गावातील शिक्षणाची परंपरा आजची नसून जवळपास दीडशे वर्षांपूर्वीची आहे. 1876 साली येथे मदरशाची स्थापना झाली आणि त्यानंतर 1880 मध्ये तुफैल अहमद यांनी गावातील पहिले शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. त्या काळापासून शिक्षणाची पायाभरणी इतकी मजबूत झाली की तीच या गावाची ओळख बनली.

आज परिस्थिती अशी आहे की जवळपास प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी सदस्य शिक्षक आहे. अनेक कुटुंबांमध्ये दोन-दोन जण शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांमध्ये शिक्षणाबद्दलची जाणीव निर्माण होते आणि तेही शिक्षक किंवा सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न पाहतात.

मोफत कोचिंगची सुविधा

सांखनी गावात शिक्षणाला चालना देण्यासाठी सामूहिक प्रयत्नही केले जातात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथे मोफत कोचिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. गावातील शिक्षक तसेच बाहेर राहणारे माजी विद्यार्थीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात.

गावातील शिक्षक हुसेन अब्बास यांनी ‘तहकीकी दस्तावेज’ नावाचे पुस्तक लिहून या गावाच्या शैक्षणिक परंपरेचा इतिहास जतन केला आहे. त्यामुळे आज सांखनी हे गाव केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात शिक्षणाची प्रेरणादायी मिसाल ठरत आहे.

टीप: वरील माहिती सामान्य स्त्रोतांवर आधारित असून तिच्या अचूकतेची स्वतंत्र पडताळणी केलेली नाही.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?