AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुमराह, सुदर्शन आणि आता…! टीम इंडियाला तिसरा धक्का बसण्याची शक्यता, हा खेळाडू मालिकेला मुकणार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. बुमराह आणि सुदर्शन स्पर्धेला मुकल्यानंतर बदली खेळाडूनंतर संघ सावरला आहे. पण आता आणखी एक खेळाडू स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.

बुमराह, सुदर्शन आणि आता...! टीम इंडियाला तिसरा धक्का बसण्याची शक्यता, हा खेळाडू मालिकेला मुकणार
बुमराह, सुदर्शन आणि आता...! टीम इंडियाला तिसरा धक्का बसण्याची शक्यता, हा खेळाडू मालिकेला मुकणारImage Credit source: BCCI
| Updated on: Aug 12, 2026 | 11:32 AM
Share

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पण या तयारीत सुरूवातीलाच विघ्न आलं.  दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाला जुळवाजुळव करताना कठीण गेलं. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकला. त्यानंतर साई सुदर्शन खेळणार की नाही यावरून संभ्रम होता. सराव सामना होईपर्यंत त्याचं खेळणं निश्चित मानलं जात होतं. पण दुखापतीतून काही सावरला नाही. त्यामुळे त्याचीही रिप्लेसमेंट द्यावी लागली. जसप्रीत बुमराहच्या जागी आकिब नबी आणि साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानची संघात नियुक्ती झाली. आता फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याचं खेळणं कठीण मानलं जात आहे. दुखापतीतून अजून सावरलेला नाही. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरही या मालिकेला मुकण्याची शक्यता वाढली आहे.

वॉशिंग्टन सुंदर श्रीलंकेत जाण्याची शक्यता कमीच

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी संघ निवडताना वॉशिंग्टन सुंदरची निवड केली होती. दुखापतग्रस्त असूनही त्याला संघात निवडलं होतं. इतकंच काय तर फक्त दुसर्‍या कसोटीत खेळेल असंही बोललं जात होतं. कारण दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण आता दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदर फिट होणं कठीण आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापन वॉशिंग्टन सुंदरबाबत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरचं श्रीलंका दौऱ्यावर जाणं कठीण दिसत आहे.

भारतीय संघाला गेल्या काही दिवसांपासून दुखापतीचं ग्रासलं आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना वॉशिंग्टन सुंदरला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यात खेळेल की नाही याबाबत साशंकता होती. असं असूनही त्याची निवड श्रीलंका दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी केली होती. पण वॉशिंग्टन सुंदरचा मागचा काही अनुभव पाहता आता बीसीसीआय ताकही फुंकून पित आहे. कारण मागेही वॉशिंग्टन सुंदर फिट असल्याचा घोषणा केल्या गेल्या. मात्र एक दोन सामने खेळल्यानंतर पुन्हा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेण्याबाबत स्पष्ट नकार दिसत आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी