PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदी कोणता स्मार्टफोन, कोणतं सिमकार्ड वापरतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (17 सप्टेंबरला) त्यांचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत (PM Narendra Modi Birthday). नेहमीप्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी त्यांचा वाढदिवस गुजरातमध्ये (Gujrat) साजरा करतील.

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदी कोणता स्मार्टफोन, कोणतं सिमकार्ड वापरतात?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (17 सप्टेंबरला) त्यांचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत (PM Narendra Modi Birthday). नेहमीप्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी त्यांचा वाढदिवस गुजरातमध्ये (Gujrat) साजरा करतील. यासाठी गुजरातमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच, ते आज त्यांच्या आईंचीही भेट घेणार आहेत.

आज नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्याबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत. त्यापैकीच एक म्हणजे, नरेंद्र मोदी यांचा मोबाईल. आपल्या देशाचे पंतप्रधान कोणता मोबाईल वापरतात? (Narendra Modi Mobile) ते कोणत्या कंपनीचं सिमकार्ड वापरतात? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असेल. आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला ते कोणता मोबोईल आणि सिमकार्ड वापरतात याची माहिती देणार आहोत.

हेही वाचा : PM Narendra Modi Birthday : नेते मंडळी आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा पाऊस

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे Apple कंपनीचा iPhone वापरताना अनेकदा दिसले आहेत. 2018 मध्ये चीन आणि दुबईच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान मोदी iPhone 6 सीरिजच्या स्मार्टफोनसोबत दिसले. सुरक्षेच्या कारणांमुळे नरेंद्र मोदी फक्त टॉप-अँड अॅपल डिव्हायसेसचा वापर करतात.

अॅपलने नुकतंच iPhone 6 सीरिजमधील iPhone 6, iPhone 6 Plus, iPhone 6S आणि iPhone 6S Plus लाँच केले.

मोदी या कंपनीचं सिमकार्ड वापरतात

मोदीं कुठलं सिमकार्ड वापरतात हे दोन वर्षांपूर्वी समोर आलं. जवळपास दोन वर्षांपूर्वी मोदींनी त्यांच्या मोबाईचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. या स्क्रिनशॉटमध्ये वोडाफोन कंपनीचं नेटवर्क होतं, त्यामुळे मोदी वोडाफोन कंपनीचं सिमकार्ड वापरत असल्याचं समोर आलं.

मोदींचे सर्वात निकटवर्तीय आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देखील अॅपल कंपनीचा फोन वापरतात. सध्या त्यांच्याकडे लेटेस्ट iPhone XS आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *