आफरीन फातिमा आहे कोण? तिचा आणि जेएनयूचा काय संबंध? प्रयागराज हिंसाचारानंतर थेट तिच्या घरावरच चालवला बुलडोझर

शाहीनबागमधील आंदोलनावेळी आफरीन फातिमा जेएनयूपासून ते इलाहाबादपर्यंतच्या आंदोलनात ती सक्रिय सहभागी होती. याबरोबरच ज्या भारतात हिजाब बंदीविरोधात ज्यावेळी आवाज उठवण्यात आला त्यावेळी आफरीन फातिमानेही आपला आवाज बुलंद केला होता.

आफरीन फातिमा आहे कोण? तिचा आणि जेएनयूचा काय संबंध? प्रयागराज हिंसाचारानंतर थेट तिच्या घरावरच चालवला बुलडोझर
आफरीन फातिमासाठी जेएनयूत आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 11:00 PM

नवी दिल्लीः प्रयागराजमधील (Prayagraj) हिंसात्मक घडलेल्या घटनेचा मास्टरमाईंड जावेद मोहम्मदचे (Mastermind Javed Mohammad) घर जमीनदोस्त करण्यात आले. त्याचे घर जमिनदोस्त झाल्यानंतर त्याची मुलगी आफरीन फातिमाच्या (Afrin Fatima) समर्थनासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आंदोलन केले गेले. शाहिनबागमधील आंदोलनाबरोबरच आफरीन फातिमा जेएनयू ते इलाहाबादपर्यंतच्या आंदोलनात ती सक्रिय होती.

नुपूर शर्माने पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये नमाजानंतर हिंसक आंदोलन झाले.

आफरिन फातिमाचे घरही उद्ध्वस्त

त्या आंदोलनानंतर पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर तात्काळ कारवाई केली जात आहे. प्रयागराजमधील हिंसाचाराचा जो मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे तो जावेद मोहम्मद उर्फ ​​जावेद पंपाच्या. त्याच्या घरावर रविवारी पोलिसांनी थेट बुलडोझरच चालवला. या कारवाईत आफरीन फातिमाचे घरही उद्ध्वस्त करण्यात आले. वास्तविक, आफरीन फातिमा जावेद अहमद यांची मुलगी आहे.

सीएए विरोधी आंदोलनात सक्रिय

आफरीन फातिमा ही जावेद अहमद यांची मोठी मुलगी आहे. ती दिल्लीत राहते आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिकते आहे. यासोबतच आफरीन फातिमा ही जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेची समुपदेशक आहे. आफरीनने सीएए विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता.

हिजाब बंदीविरोधात आवाज

शाहीनबागमधील आंदोलनावेळी आफरीन फातिमा जेएनयूपासून ते इलाहाबादपर्यंतच्या आंदोलनात ती सक्रिय सहभागी होती. याबरोबरच ज्या भारतात हिजाब बंदीविरोधात ज्यावेळी आवाज उठवण्यात आला त्यावेळी आफरीन फातिमानेही आपला आवाज बुलंद केला होता. एवढच नाही तर तिने जेएनयूमध्ये असतानाच हिजाब बंदीवर दक्षिण भारतातील काही शहरांना भेटी देऊन तेथील आंदोलनामध्ये तिने सहभाग नोंदविला होता.

भाषाशास्त्रातून जेएनयूतून अभ्यास

प्रयागराज हिंसेतील मुख्य आरोपी जावेद मोहम्मदची मोठी मुलगी आफरीन हिचा जन्म प्रयागराजमध्येच झाला होता. आफरीनने पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने अलिगड मुस्लिम विद्यापीठात तिने प्रवेश घेतला. अलिगड मुस्लिम विद्यापीठातून भाषाशास्त्रातून बीए ऑनर्स आणि एमए केले आहे. अलिगड विद्यापीठात शिकत असतानाच तिने विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यावेळेपासून ती विद्यार्थ्याच्या प्रश्नांवर नेहमीच जाहीररित्या बोलत आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी लढणारी फातिमा

विद्यार्थ्यांच्या राजकीय चळवळीत, विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी लढणारी फातिमा मात्र आता सांगते आहे की, आपल्या वडिलांसाठी, आईसाठी आणि बहिणीसाठी ती चिंतित आहे. तिने माध्यमांशी बोलताना सांगितले की अजून मला माहिती नाही की, माझे वडील आणि घरातील लोक कुठे आहेत ते. ती सांगते आहे की, मध्यरात्रीच माझ्या घराती महिलांना, लहान मुलांना जबरदस्तीने घरातून बाहेर काढले आहे.

फातिमाच्या समर्थनासाठी जेएनयूत आंदोलन

प्रयागराज हिंसाचारातील मास्टरमाईंड जावेद मोहम्मदच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. त्यानंतर जेएनयूमध्ये सायंकाळी उशिरा शाम जावेदची मुलगी आफरीन फातिमाच्या समर्थनासाठी निदर्शनं झाली आहेत. एसएसपी यांनी सांगितले की, मोहम्मद जावेदची मुलगी फातिमा ही जेएनयूमध्ये शिकते आहे, आणि ती जावेदला सोडविण्यासाठी प्रयत्न करते आहे.

दोषी आढळली तर अटक होणार?

आफरीन जर आपल्या वडिलांबरोबर दोषी आढळलीच तर दिल्ली पोलीस जेएनयूमधूनच तिला ताब्यात घेऊ शकतात असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रयागराज हिंसाचारप्रकरणी 95 लोकांविरोधात गुन्हा दाखल करुन पाच हजार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.