पंतप्रधान यांच्या तोंडातले बिस्किट काढून घेणारा ‘हा’ दबंग अधिकारी कोण, ज्याची साडे सहा तासात झाली सहा ठिकाणी बदली

आयएएस झाल्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना अधिकाऱ्यांना राजकीय नेते, मंत्री यांच्यासोबत तडजोडी कराव्या लागतात. त्यांचे ऐकले नाही तर संकटांना तोंड द्यावे लागते. मात्र, त्यातही काही इमानदार अधिकारी असून त्यांच्या इमानदारीचे बक्षीस मिळते ते म्हणजे अनेक ठिकाणी होणाऱ्या बदल्या.

पंतप्रधान यांच्या तोंडातले बिस्किट काढून घेणारा 'हा' दबंग अधिकारी कोण, ज्याची साडे सहा तासात झाली सहा ठिकाणी बदली
SUPRIM COURT AND LOKSABHAImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 6:03 PM

मुंबई : महाराष्ट्रात असे एक अधिकारी आहेत की ते कोणत्याही मंत्र्यांना आपल्या खात्याचे सचिव म्हणून नको असतात. कोणत्याही जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना, आमदारांना ते जिल्हाधिकारी म्हणून नको असतात. तरीही ते सर्वाधिक चर्चेत असतात. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची शिस्त यामुळे ते जिथे जातात तिथे आपली छाप पाडतात. पण, प्रामुख्याने ते चर्चेत असतात ते त्यांच्या वारंवार होणारी बदल्यांमुळे. 16 वर्षात 20 वेळा बदल्या झालेले महाराष्ट्रातील ते एकमेव अधिकारी आहेत. हा अधिकारी आहे 2005 सालच्या आयएसएस बॅचचे तुकाराम मुंडे. मात्र, एकाच दिवसात साडे सहा तासात सहा ठिकाणी बदली आल्याचा विक्रम आणखी एका दबंग अधिकाऱ्याच्या नावावर आहे.

आयएएस झाल्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना अधिकाऱ्यांना राजकीय नेते, मंत्री यांच्यासोबत तडजोडी कराव्या लागतात. त्यांचे ऐकले नाही तर संकटांना तोंड द्यावे लागते. मात्र, त्यातही काही इमानदार अधिकारी असून त्यांच्या इमानदारीचे बक्षीस मिळते ते म्हणजे अनेक ठिकाणी होणाऱ्या बदल्या. याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी टी एन शेषन.

हे सुद्धा वाचा

तामिळनाडूतुन 1955 च्या बॅचमधुन टी. एन. शेषन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. वाद आणि शेषन यांचं सुरुवातीपासूनच घट्ट नातं होतं. 15 मे 1933 रोजी त्यांचा जन्म केरळमधील पल्लकड जिल्ह्यात झाला. वडील त्यांना शाळेत दाखल करायला गेले तेव्हा त्यांचे वय आड येत होतं. तेव्हा त्यांची जन्मतारीख बदलण्यात आली होती. 1955 मध्ये आयएएस झाल्यावर त्यांना अनेकांनी जन्मतारीख बदलून घ्या असं सुचवलं, पण त्यांनी त्यास नकार दिला.

1985 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना शेषन यांना दिल्लीला बोलवण्यात आले. वन, संरक्षण आणि शेवटी मंत्रिमंडळाचे सचिव अशी त्यांची पदोन्नती झाली. तर, 1987 मध्ये पंतप्रधानांचे सुरक्षा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

डिसेंबर 1989 मध्ये सत्तांतर होईपर्यंत मंत्रिमंडळ सचिव आणि पंतप्रधानांचे सुरक्षा सचिव अशा दोन्ही जबाबदाऱ्या शेषन सांभाळत होते. या काळात त्यांनी राजीव गांधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांची सुरक्षा अतिशय कौशल्यानं पार पाडली.

पंतप्रधान यांच्या तोंडातून बिस्किट काढून घेतले

पंतप्रधान राजीव गांधी यांचे सुरक्षा सचिव असताना त्यांनी एकदा थेट पंतप्रधान यांच्या तोंडातून बिस्किट काढून घेतले होते. याचे कारण म्हणजे 1986 मध्ये राजीव गांधी यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला होता. त्या घटनेची चौकशी शेषन यांची केली होती. हा प्रयत्न फसल्यानंतर पंतप्रधान यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो या दृष्टीने त्यांचे सुरक्षा सचिव म्हणून शेषन अतिशय काळजीपूर्वक निणर्य घेत होते.

साडे सहा तासात सहा ठिकाणी बदली

1962 मध्ये टी. एन. शेषन उपजिल्हाधिकारी होते. त्यावेळी त्यांनी एका अधिकाऱ्याला घोटाळा करण्यापासुन रोखले होते. त्या अधिकाऱ्याने थेट मंत्र्याला गाठून आम्हाला पैसे खाऊ देत नाहीत अशी तक्रार केली. त्या मंत्र्यांनी लगेच फोन फिरवले. सुत्रे हलवली गेली आणि शेषन यांची बदल झाली.

त्यांची जिथे बदली केली त्यांनाही शेषन आपल्या कार्यालयात नको होते. पुन्हा मंत्र्यांचे फोन गेले असे दोन नव्हे तर सहा वेळा घडले आणि एकाच दिवशी सकाळी 10.30 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत टी एन शेषन यांची सहा वेळा बदली करण्यात आली. हा एक विक्रम त्यांच्या नावे जमा झाला.

मंत्र्याने गाडीतून खाली उतरवले

तामिळनाडूमध्ये जिल्हाधिकारी असतानाची ही घटना आहे. एका मंत्र्याने त्यांना आपल्या सोबत गाडीत घेतले. गाडीत असतानाच त्या मंत्र्याने शेषन यांना एक नियमात न बसणारे काम सांगितले. त्यांनी ते काम करण्यास नकार दिला. त्यावर मंत्र्यांनी चिडून त्यांना थेट गाडीतून खाली उतरवले. निर्मनुष्य अशा त्या रस्त्यावरून शेषन यांनी पायी चालत पुढचा प्रवास केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त म्हणून वादळी कारकीर्द

मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर शेषन यांनी आयोगाच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवला. घटनात्मक कायद्याचा आधार घेऊनच शेषन यांनी आपली भूमिका जनतेपर्यंत पोहचवली. आयोगाकडे निवडणूक खर्चाबाबत जवळपास 40 हजार प्रकरणे प्रलंबित होती. शेषन यांनी त्यांची छाननी केली. ज्यांनी ठराविक नमुन्यात खर्चाचं विवरण दिले नव्हते अशा 14 हजार लोकप्रतिनिधींना त्यांनी पुढची निवडणूक लढवण्याला मनाई घातली.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.