AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे राजस्थानमधील योगी, मतदारांची ज्यांंना मुख्यमंत्री म्हणून पसंती

Chief Minister of rajasthan : राजस्थान विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. ३ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाला लागणार आहे. पण त्याआधी आलेल्या एक्झिट पोलने सर्वच पक्षांची झोप उडवली आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीसाठी आणखी एक नाव चर्चेत आले आहे. ज्यांना राजस्थानचे योगी असेही म्हटले जाते.

कोण आहे राजस्थानमधील योगी, मतदारांची ज्यांंना मुख्यमंत्री म्हणून पसंती
yogi
| Updated on: Dec 01, 2023 | 2:57 PM
Share

Assembly election 2023 : राजस्थानमध्ये असलेले काँग्रेस सरकार कायम राहणार की राज्यात सत्ताबदल होणार याचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. दर 5 वर्षात सरकार बदलण्याचा ट्रेंड कायम राहणार का याकडे ही देशाचं लक्ष लागलं आहे. निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचं टेन्शन वाढवलं आहे. कारण दोघांमध्य कांटे की टक्कर दिसत आहे. सर्वेक्षणात मुख्यमंत्री कोण असावा असा देखील प्रश्न लोकांना विचारण्यात आला तेव्हा एक नवीन नाव पुढे आले आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी मतदारांची पहिली पंसती अशोक गेहलोत यांनी होती. त्यानंतर ना वसुंधरा राजे यांचे नाव आहे ना सचिन पायलट यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर महंत बालकनाथ योगी हे मुख्यमंत्रीपदासाठी जनतेची दुसरी पसंती आहेत. सर्वेक्षणात 10 टक्के लोक बालकनाथ योगी यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात.

कोण आहेत बालकनाथ योगी?

महंत बालकनाथ योगी हे अलवरचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिजारा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्यांपैकी एक असलेले बाबा बालकनाथ हे योगी आदित्यनाथ यांच्यासारखेच राहतात. त्यांचा पेहराव देखील तसाच आहे.  त्यामुळे लोक त्यांना राजस्थानचे योगी असे ही म्हणतात.

बाबा बालकनाथ यांची त्यांच्या मतदारसंघात चांगली पकड आहे. विधानसभा निवडणुकीतही भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा यामुळे साधला गेला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने राजस्थानमध्ये त्यांना उपाध्यक्ष केले आहे.

महंत बालकनाथ योगी यांचा जन्म १६ एप्रिल १९८४ रोजी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. ते त्यांच्या आई-वडिलांचे एकुलता एक मुलगा आहे.

वयाच्या ६ व्या वर्षी घर सोडले

वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी महंत खेतनाथ यांनी अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी आपले घऱ सोडले. महंत खेतनाथ यांनी लहानपणीच त्यांना गुरुमुख हे नाव दिले होते. महंत खेतनाथ यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर ते महंत चंदनाथ यांच्याकडे आले. त्यांची बालसुलभ प्रवृत्ती पाहून महंत चंद नाथ त्यांना बालकनाथ म्हणू लागले. महंत चंद नाथ यांनी 29 जुलै 2016 रोजी त्यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. महंत बालकनाथ योगी हे हिंदू धर्मातील नाथ संप्रदायाचे आठवे संत आहेत. बालकनाथ योगी हे बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे कुलपतीही आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या जवळचे

योगीसारखे भगव्या कपड्यात दिसणारे बाबा बालकनाथ आपल्या आक्रमक वृत्तीमुळे अनेकदा चर्चेत राहतात. बाबा बालकनाथ यांनी 2019 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक जिंकली. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भंवर जितेंद्र सिंह यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.

बाबा बालकनाथ हे त्याच नाथ संप्रदायाचे महंत आहेत ज्यांच्याशी योगी आदित्यनाथ संबंधित आहेत. बालकनाथ हे रोहतक येथील बाबा मस्तनाथ मठाचे महंत आहेत. नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार योगी आदित्यनाथ हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर रोहतक गद्दी यांच्याकडे उपाध्यक्षपद आहे. अशा परिस्थितीत ते सीएम योगींच्या जवळचे मानले जातात.

बाबा बालकनाथ हे ओबीसी प्रवर्गातून येतात. बालकनाथ यांनी निवडणूक आयोगात अर्ज दाखल केला. त्यानुसार त्यांचे वय 39 वर्षे आहे. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.