AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Election Opinion Poll | यूपी-बिहारमध्ये कुठला पक्ष किंग ठरणार? NDA की INDIA? आकडे आले समोर

Lok Sabha Election Opinion Poll | टीवी9 ओपिनियन पोलचे आकडे समोर आले आहेत. केंद्रात सरकार बनवण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहार ही दोन राज्य भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी खूप महत्त्वाची आहेत. ओपिनियन पोलचे आकडे जाहीर झाले आहेत. कुठला पक्ष कुठल्या राज्यात सरस ठरणार? कोण बाजी मारतय? त्यासाठी एकदा ही बातमी वाचा.

Lok Sabha Election Opinion Poll | यूपी-बिहारमध्ये कुठला पक्ष किंग ठरणार? NDA की INDIA? आकडे आले समोर
Opinion Polll
| Updated on: Mar 16, 2024 | 1:24 PM
Share

Lok Sabha Election Opinion Poll | लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी भाजपा, काँग्रेसससह सर्वच पक्ष तयार आहेत. निवडणूक आयोग आज लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणार आहे. पीएम मोदी यांनी NDA आघाडीसाठी 400 जागा जिंकण्याच लक्ष्य ठेवलं आहे. काँग्रेसने विरोधी पक्षांची INDIA आघाडी केलीय. त्यांचा भाजपाला रोखण्याचा प्रयत्न आहे. सत्तेच्या खुर्चीवर कोणाला बसवायच? याचा फैसला जनता करणार आहे. यामुळे जनता इंडिया की, एनडीए कोणावर विश्वास दाखवणार? ते महत्त्वाच आहे.

INDIA फ्रंटच प्रदर्शन कस असेल? एनडीएला किती जागा मिळणार? कुठल्या मुद्यावर जनता मतदान करणार? कुठल्या नेत्यावर त्यांना विश्वास आहे? विरोधी पक्ष INDIA आघाडीबद्दल लोकांच्या मनात काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज TV9 भारतवर्षच्या ओपिनियन पोलमध्ये मिळणार आहेत. ओपिनियन पोलची सुरुवात उत्तर प्रदेशपासून झालीय. तिथे भाजपाच्या नेतृत्वाखाली NDA ला मोठा विजय मिळणार आहे. INDIA आघाडीला मोठा झटका बसेल.

एवढ्या मोठ्या राज्यात काँग्रेसला मिळेल फक्त एक जागा

TV9 भारतवर्षच्या ओपिनियन पोलनुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा विजय मिळू शकतो. ओपिनियन पोलनुसार, भाजपा NDA ला प्रदेशातील 80 पैकी 73 जागांवर विजय मिळू शकतो. INDIA आघडीचा जास्त प्रभाव यूपीमध्ये दिसणार नाही. काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळू शकतो. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी 6 जागा मिळू शकतात. 73 पैकी 70 जागा एकट्या भाजपाला मिळू शकतात.

बिहारच्या जनतेचा कौल कुणाला?

ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये सुद्धा भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएला मोठा विजय मिळेल. इथे 40 लोकसभा मतदारसंघात एनडीएला 38 सीट मिळू शकतात. दोन जागांवर काँग्रेस विजयी होऊ शकते. बिहार मध्ये 40 पैकी 17 सीट बीजेपी आणि जनता दल यूनायटेडला 15 सीटवर विजय मिळू शकतो. लोकजनशक्ति पार्टीला 5 सीटे मिळू शकतात. जीतन राम मांझी यांच्या HAM पार्टीला एक जागा मिळू शकते. INDIA आघाडीच्या खात्यात फक्त दोन जागा जाऊ शकतात. लालू प्रसाद यादव यांच्या RJD ला तगडा झटका बसेल.

पंजाबमध्ये केजरीवालच सरस

टीवी9 च्या ओपिनियन पोलमध्ये आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये सगळ्यांनाच धक्का दिलाय. पंजाबमध्ये 13 पैकी आपला 11 जागांवर विजय मिळू शकतो. भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएला फक्त 2 जागांवर समाधान मानाव लागेल. काँग्रेस पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढतेय. त्यांना एकही जागा मिळणार नाही.

Follow Us
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही