AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना कुणाची? थेट डॉ. आंबेडकरांच्या विधानाचा दाखला, कुणाची कोंडी? सुप्रीम कोर्टात काय काय घडतंय?

सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची यावरुन सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटाने आमदार अपात्रतेप्रकरणात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता रितसर युक्तीवाद सुरु झाला आहे.

शिवसेना कुणाची? थेट डॉ. आंबेडकरांच्या विधानाचा दाखला, कुणाची कोंडी? सुप्रीम कोर्टात काय काय घडतंय?
MLA Disqualification Case
| Updated on: Aug 06, 2026 | 8:46 PM
Share

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ कबिल सिब्बल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने युक्तीवाद करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना ठाकरे गटाने तीन वर्षांपूर्वी ही आमदार अपात्रते संदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरु आहे. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली. यानंतर खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत सुनावणी सुरु आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल कालपासून युक्तीवाद करत आहे. यावेळी कपिल सिब्बल म्हणाले की माननीय न्यायमूर्तींनो, अखेरीस असे म्हणावे लागेल की, संस्थात्मक अखंडता (institutional integrity) ही लोकशाही व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे. संस्थात्मक अखंडतेचा अभाव हा लोकशाहीच्या पायाभूत तत्त्वांनाच कमकुवत करतो.

यावर न्यायमूर्ती जॉयमल्या बागची म्हणाले की निवडणूक आयोगाने स्वतः संस्थात्मक अखंडतेच्या महत्त्वाचा प्रभावीपणे उल्लेख केला आहे. आयोगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचाही संदर्भ दिला आहे.

यावर ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल म्हणाले की होय. यानंतर न्यायमूर्ती जॉयमल्या बागची म्हणाले की आयोगाने डॉ. आंबेडकर यांच्या निरीक्षणांची पुनरावृत्ती केली आहे आणि पक्षांतर (defection) हे संविधानिक पाप असल्याच्या मताचाही संदर्भ दिला आहे. मात्र, आजच्या काळात ते पाप न राहता अभिमानाचे चिन्ह (badge of honour) बनल्याचे दिसते.त्यानंतर ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल: होय, अगदी बरोबर.

न्यायमूर्ती जॉयमल्या बागची म्हणाले की डॉ. आंबेडकरांनी म्हटले होते की, एखादे संविधान कितीही चांगले असले, तरी ते राबविण्याची जबाबदारी असलेले लोक जर चुकीचे असतील, तर ते संविधानही चुकीचे ठरण्याची शक्यता असते.

ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तीवाद करताना म्हणाले की माननीय न्यायमूर्तींनो, आमचा युक्तिवाद नेमका हाच आहे. जर संबंधित प्राधिकरणे स्वतःच या तत्त्वांचे पालन करत नसतील, तर केवळ या तत्त्वांचा उल्लेख करण्यात काही अर्थ नाही. यावर न्यायमूर्ती जॉयमल्या बागची म्हणाले की हीच चिंता परिच्छेद ९२ मध्ये प्रतिबिंबित झाली आहे. त्यानंतर ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल म्हणाले की होय, माननीय न्यायमूर्तींनो. मी त्यावर पुढे येईन.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल