नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भूखंड घोटाळा उघड झाल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर शिंदे यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे केंद्रसरकारला दिली आहेत. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांनाही काही कागदपत्रे दिली आहेत. मात्र, शिंदे यांच्या या घोटाळ्यावरून राऊत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाच टार्गेट केलं आहे. अण्णा हजारे कुठे अदृश्य झाले आहेत. ते राज्यातील घोटाळ्यांवर का बोलत नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.