AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Citizenship : या श्रीमंतांना एवढी कसली धाड भरली? गाशा गुंडाळून पळतायेत तरी कुठे?

Indian Citizenship : परराष्ट्र मंत्रालयानुसार, 2022 मध्ये 2 लाख 25 हजार भारतीयांनी नागरिकत्व सोडले. वर्ष 2011 ते 2022 या दरम्यान सर्वाधिक भारतीयांनी नागरिकत्व सोडले आहे.

Indian Citizenship : या श्रीमंतांना एवढी कसली धाड भरली?  गाशा गुंडाळून पळतायेत तरी कुठे?
| Updated on: Feb 28, 2023 | 6:50 PM
Share

नवी दिल्ली : भारतातील श्रीमंतांना कशाची अनामिक भीती सतावत आहेत, हे माहिती नाही, पण अब्जाधीश (Billionaires) भारतातून पलायन करत आहेत. Residence by Investment असे या पलायनवादाला गोंडस नाव आहे. यापूर्वी Brain Drain हा प्रकार आपण ऐकलाच आहे. भारत सोडून जाणाऱ्या या भारतीयांना एचएनआय अथवा डॉलर मिलिनेयर्स असेही म्हणतात. अर्थात हे श्रीमंत लोक देश का सोडत आहेत. त्यामागील कारणे काय आहेत, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला सतावत आहेत. ही श्रीमंत भारताचं नागरिकत्व का (Giving Up Citizenship) सोडत आहे, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालयानुसार, 2022 मध्ये 2 लाख 25 हजार भारतीयांनी नागरिकत्व सोडले. वर्ष 2011 ते 2022 या दरम्यान सर्वाधिक भारतीयांनी नागरिकत्व सोडले आहे. संसदेत 9 फेब्रुवारी रोजी ही माहिती सादर करण्यात आली.

इतर देशात भारताच्या मानाने उद्योग आणि भविष्याच्या उज्वल संधी हे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. तसेच आरोग्य, उत्तम आणि मनमोकळं जगण्याचे स्वातंत्र्य, शिक्षणाच्या उत्तम संधी, प्रगती करण्यासाठीच्या सोयी-सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती अशी काही कारणे समोर येत आहेत. या कारणांमुळे परदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांची संख्या या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकदा विदेशात गेल्यावर तिथल्या सोयी-सुविधा, स्वच्छता, मोफत आणि दर्जेदार शिक्षण, करिअरच्या उत्तम संधी, स्वातंत्र्य, निसर्ग या गोष्टी भारतीयांना भूरळ घालत असल्याचे एका केस स्टडीमधून समोर आले आहे.

काही नागरीक नोकरीनिमित्त परदेशात जातात. त्यांचा कार्यकाळ वाढत जातो. त्यानंतर तिथल्या वातावरणाशी ते एकरुप होतात. परत भारतात येण्याची त्यांची इच्छा नसते. ते नागरिकत्वासाठी अर्ज करतात. अर्ज मंजूर झाला तर कायमचे त्या देशाचे निवासी होतात. स्थानिक लोकांमध्ये तेही तिथल्या समाजाचा भाग होतात. तसेच त्यांना राजकीय, सामाजिक संधी मिळत असल्यानेही काही जण तिथेच कायमचे स्थायिक होतात. अटी व शर्तींचे पालन केले तर काही देशात पाच वर्षांतच तिथले नागरिकत्व मिळते.

देशात सोडण्यात एचएनआय हा फॅक्टरही महत्वाचा ठरतो. ज्यांची एकूण संपत्ती, मालमत्ता एक दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे. त्यांचा ओढा परदेशाकडे दिसून येतो. कारण रुपयांमध्ये त्यांची रक्कम 8.2 कोटी रुपये होते. हेनले जागतिक नागरिक रिपोर्ट(Henley Global Citizens Report) नुसार, भारतात या समूहात जवळपास 3 लाख 47 हजार लाख नागरीक आहेत. डिसेंबर 2021 पर्यंतचा हा आकडा आहे. हे श्रीमंत नागरीक देशातील केवळ नऊ शहरातील आहेत. त्यातही दिल्ली आणि मुंबईतील नागरिकांचा भरणा अधिक आहे.

जगभरातील असमानतेच्या अहवालात, भारताचे ही मूल्यमापन करण्यात आले आहे. भारत हा गरीब आणि असमानता असलेला देश असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, श्रीमंतांच्या हातातच सत्तेची किल्ली आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये याविषयीच्या रिपोर्टआधारे वृत्त देण्यात आले होते. त्यात देशातील एकूण कमाईचा 57 टक्के हिस्सा 10 टक्के लोकांच्या हातात आहे. तर देशातील एकूण कमाईचा 50 टक्के हिस्सा केवळ 13 टक्के लोकांकडे आहे.

या अहवालानुसार, 2020 मध्ये जगभरातील एकूण कमाईमध्ये मोठी घसरण आली आहे. वर्ल्ड इनिक्वेलिटी लॅबच्या अहवालानुसार, भारत गरीब आणि असमानता असणारा देश आहे. भारतीय मध्यमवर्ग गरीब असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. देशाच्या एकूण कमाईत या वर्गाचा वाटा केवळ 29.5 टक्के आहे. तर देशातील 10 टक्के श्रीमंतांच्या हातात 33 टक्के संपत्ती आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.