भाजपने सहा आमदार फोडले; तरीही नितीश कुमार यांना फरक का पडत नाही?

भाजपने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे अरुणाचल प्रदेशातील सहा आमदार फोडले. (Why BJP's 6 MLAs take away not affecting much Bihar CM Nitish Kumar)

भाजपने सहा आमदार फोडले; तरीही नितीश कुमार यांना फरक का पडत नाही?
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 4:06 PM

पाटणा: भाजपने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे अरुणाचल प्रदेशातील सहा आमदार फोडले. भाजपने जेडीयूला एवढं मोठं खिंडार पाडलं तरी नितीशकुमार शांत आहेत. आमदार फोडल्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही, असं नितीशकुमार यांनी सांगितलं. तर, जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी भाजपच्या या राजकारणावर टीका केली आहे. भाजपचं हे राजकारण मैत्रीसाठी योग्य नाही, असं सांगतानाच पण त्यामुळे बिहारमध्ये या घटनेचा काही परिणाम होणार नसल्याचंही त्याागी यांनी स्पष्ट केलं आहे. (Why BJP’s 6 MLAs take away not affecting much Bihar CM Nitish Kumar)

फरक का पडत नाही?

बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयूला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. तरीही भाजपच्या मेहरबानीवर त्यांना राज्यात मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. त्यामुळे नितीशकुमार सध्या बॅकफूटवर आहे. पक्षाची राज्यात वाताहत झाल्याने त्यांना पक्ष बांधणीवर जोर द्यायचा आहे. शिवाय त्यांचं पहिलं प्राधान्य बिहार आहे, त्यामुळे बिहारमधील जनाधार पुन्हा मिळवणं हेच त्यांचं लक्ष असल्याने भाजपने अरुणाचल प्रदेशात पक्षाला खिंडार पाडलं तरी नितीशकुमार यांनी संयमाची भूमिका घेतल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.

जेडीयूचा पुढचा प्लान काय?

26 आणि 27 डिसेंबर रोजी जेडीयूचं राष्ट्रीय अधिवेशन पटना येथे होणार आहे. त्यात अरुणाचलच्या विषयावर चर्चा होणार आहे. पण या अधिवेशनाचा मेन फोकस बिहारमध्ये जनाधार वाढण्यावर असणार आहे. जेडीयूचं राजकारण आतापर्यंत अति मागास, सवर्ण, दलित आणि कुशवाहा सामाजा भोवती फिरत होतं. आता जातीय समीकरणं जुळवतानाच त्या त्या जातीतील नेत्यांना बळ देण्याचं काम जेडीयू करणार असल्याचं जेडीयूतील सूत्रांनी सांगितलं. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत 15.34 टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे जेडीयूने मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी हातपाय मारण्यास सुरुवात केली आहे. गतवैभव मिळवून आघाडीच्या राजकारणात मानाचं स्थान निर्माण करण्याचा जेडीयूचा प्रयत्न असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

जातीनिहाय जनाधार वाढवणार

दुसऱ्या फळीतीली नेत्यांनना पुढे आणून जुन्या समाजवादी नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यावरही जेडीयू भर देणार आहे. राजपूत समाजाचे बडे नेते आणि नितीशकुमार यांचे जुने सहकारी नरेंद्र सिंह यांना पक्षात आणण्याचा जेडीयूचा प्रयत्न आहे. नरेंद्र सिंह यांचे चिरंजीव सुमित सिंह हे अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले आहेत. शिवाय ते जेडीयूमध्ये सामील झाले आहात. त्याचप्रमाणे राजपूत समाजातील लेसी सिंह, संजय सिंह, भूमिहार समाजातील नीरज कुमार, शालिनी मिश्रा, ब्राह्मण समाजातील संजय झा, अजय चौधरी, यादव समाजातील निखिल मंडल, विनोद यादव, वैश्य समाजातील सुनिल कुमार पिंटू आणि ललन सर्राफ, दलित समाजातील महेश्वरी हजारी आलोक सुमन, अशोक चौधरी, मुस्लिम समाजातील खालिद अनवर, कमरे आलम आदी नेत्यांना पक्षात आणून त्यांना मोठी जबाबदारी देण्याचंही जेडीयूत घटत आहे. 2005 मध्ये जेडीयू ज्या पद्धतीने मजबूत होता. त्याच पद्धतीने आताही जेडीयूला मजबूत करण्याचा नितीशकुमार यांचा इरादा आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांचे जुने सहकारी उपेन्द्र कुशवाह आणि अरुण कुमार यांच्याशी चर्चाही केली आहे. (Why BJP’s 6 MLAs take away not affecting much Bihar CM Nitish Kumar)

आरजेडीची ऑफर

भाजपने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून 2025मध्ये भाजपला बिहारची सत्ता स्वत:च्या ताब्यात घ्यायची आहे. तर दुसरीकडे 2005 आणि 2010 प्रमाणे पक्षाला मजबूत करण्यावर जेडीयूने भर दिला आहे. त्यामुळे भाजपने अरुणाचलमध्ये आमदार फोडले तरी जेडीयूने त्यावर रिअॅक्ट न होणंच पसंद केलं आहे. भाजपने जेडीयूचे आमदार फोडल्यानंतर आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी जेडीयूला एकत्र येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यावर अब आया ऊंट पहाड के नीचे, अशी खोचक टिप्पणी नितीशकुमार यांनी केली होती. तर भाजप हा अजगर असून जेडीयूला गिळून टाकेल असं काँग्रेसने म्हटलं होतं. (Why BJP’s 6 MLAs take away not affecting much Bihar CM Nitish Kumar)

संबंधित बातम्या:

जे महाराष्ट्रात घडत होतं, तेच बंगालमध्ये? शाहांची स्ट्रॅटेजी, भाजपात धूसफुस?

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट

नितीश कुमारांना मोठा झटका; भाजपने JDU चे सहा आमदार फोडले

(Why BJP’s 6 MLAs take away not affecting much Bihar CM Nitish Kumar)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.