AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वकील काळा आणि डॉक्टर पांढराच कोट का घालतात? तुम्हालाही माहिती नसेल उत्तर

वकील काळा कोट आणि डॉक्टर पांढऱ्या कलरचा कोटच का घालतात? असा प्रश्न अनेकांना नेहमी पडतो, याबाबत मोठी उत्सुकता असते, तुम्हालाही असा प्रश्न कधी-कधी पडत असेल, आज आण त्याचं उत्तर जाणून घेणार आहोत.

वकील काळा आणि डॉक्टर पांढराच कोट का घालतात? तुम्हालाही माहिती नसेल उत्तर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 8:00 PM
Share

वकील काळा कोट आणि डॉक्टर पांढऱ्या कलरचा कोटच का घालतात? असा प्रश्न अनेकांना नेहमी पडतो, याबाबत मोठी उत्सुकता असते, तुम्हालाही असा प्रश्न कधी-कधी पडत असेल, आज आण त्याचं उत्तर जाणून घेणार आहोत. काळ्या रंगाला नेहमी गंभीरता, शक्ती आणि आदराचं प्रतिक म्हणून मानलं जातं, त्यामुळे वकील त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात काळ्या रंगाचा कोट घालतात. मात्र वकिलांनी काळा कोट घालणं ही परंपरा फार जुनी आहे. इतिहासाचा धांडोळा घेतला तर याची सुरुवात 17 व्या शतकात झाली, 17 व्या शतकात ब्रिटनचे राजे चार्स द्वितीय यांच्या निधनानंतर ही परंपरा सुरू झाली असं मानलं जातं, चार्स यांचं निधन झाल्यानंतर शोक व्यक्त करण्यासाठी वकील आणि न्यायाधिशांनी काळा कोट घातला होता.तिथून पुढे या परंपरेला सुरुवात झाली. काळा कोट म्हणजे शक्ती, गंभीरता आणि आदराचं प्रतिक असल्यामुळे वकील कोर्टामध्ये काळा कोट घालूनच केस लढवतात, तसेच न्याय‍धीश देखील काळा कोट परिधान करूनच न्यायादानाचं काम करतात.

आता जाणून घेऊयात डॉक्टर का पाढंरा रंगाचा कोट घालतात, पांढरा रंग हा स्वच्छता आणि विश्वासाचं प्रतिक मानला जातो. वैद्यकीय क्षेत्रात स्वच्छतेला खूपच महत्त्व आहे. तसेच डॉक्टरने जर पांढर रंगाचा कोट घातला असेल तर रुग्णाला देखील विश्वास येतो की, हा व्यक्ती आपला जीव वाचवू शकतो, आजारापासून आपली सुटका करू शकतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वच्छतेचं आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये स्वच्छता खूप महत्त्वाची असते, तुम्ही जर पाढंरा कोट घातला असेल तर त्यावर पडलेले डाग लगेचच दिसतात, त्यामुळे देखील डॉक्टर पांढऱ्या रंगाचा कोट घालतात, तसेच डॉक्टरांनी पांढऱ्या रंगाचा कोट घालावा आणि वकिलांनी काळा कोट घालावा हा एक इथिकचा देखील भाग आहे, त्यामुळे तुम्हाला वकील नेहमी काळ्या कोटमध्ये आणि डॉक्टर पांढऱ्या कोटमध्ये दिसतात.

डॉक्टर आणि वकील हे समाजाचे महत्त्वाचे भाग आहेत, डॉक्टरांमुळे व्यक्तीला विविध आजारांमधून मुक्ती मिळते, तर वकील एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळून देण्याचं काम करतात. काळा रंग हा गंभीरता, शक्ती आणि आदराचं प्रतिक म्हणून मानलं जातं, त्यामुळे वकील त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात काळ्या रंगाचा कोट घालतात. तसेच पांढरा कलर हा स्वच्छता आणि विश्वास याचं प्रतिक असंत त्यामुळे डॉक्टर पांढऱ्या रंगाचा कोट घालतात.

Follow Us
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?