AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात फक्त कोलकाता पोलीसच पांढरी वर्दी का घालतात? तुम्हालाही माहीत नसेल खरं कारण

देशातील सर्वच पोलीस खाकी वर्दी घालतात, मात्र कोलकाता हे एकमेव शहर असं आहे की येथील पोलीस पांढरी वर्दी घालतात, नेमकं या मागे काय कराण असावं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

देशात फक्त कोलकाता पोलीसच पांढरी वर्दी का घालतात? तुम्हालाही माहीत नसेल खरं कारण
Kolkata PoliceImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 27, 2026 | 7:13 PM
Share

पोलीस म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवते ती म्हणजे त्यांच्या अंगावर असलेली खाकी वर्दी, मात्र तुम्हाला माहीत आहे का? कोलकाता हे एकमेव असं शहर आहे, तेथील पोलीस खाकी वर्दी न घालता पांढरा यूनिफॉर्म घालतात, यामागे नेमकं काय कारण असू शकतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? कोलकाता पोलिसांची वर्दी सुरुवातीपासूनच पांढऱ्या रंगाची आहे. विशेष म्हणजे भारतात पोलीस प्रणालीची सुरुवातच ही कोलकाता शहरापासून झाली. कोलकातामध्ये इंग्लंडच्या इस्ट इंडिया कंपनीने पोलीस प्रणालीची सुरुवात केली. कोलकातामध्ये इस्ट इंडिया कंपनीचे प्रमुख अधिकारी जॉब चार्नोक यांनी 1690 मध्ये हुगळी नदीच्या काठी असलेल्या सुतानुती गावात तळ ठोकला होता. त्यावेळी इस्ट इंडिया कंपनीकडून आसपासचे तीन गाव खरेदी करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना पोलिसांची गरज भासली, तेव्हापासूनच भारतात पोलीस प्रणालीला सुरुवात झाली.

सुरुवातीला इस्ट इंडिया कंपनीच्या काळात या पोलिसांची वर्दी पांढऱ्या रंगाची होती. नंतर हळुहळु संपूर्ण भारतामध्ये पोलीस व्यवस्था आली, पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये बदल झाला. पोलिसांनी खाकी वर्दी घालण्यास सुरुवात केली. मात्र कोलकाता पोलिसांनी आपली पांढरी वर्दी कायम ठेवली. पश्चिम बंगालच्या इतर सर्व भागामध्ये पोलीस खाकी वर्दीच वापरतात मात्र फक्त कोलकाता हे एकमेव शहर असं आहे, जिथे आजाही पोलीस पांढरा युनिफॉर्म घालतात.

त्यामागे अजून एक महत्त्वाचं कारण हे देखील सांगितलं जातं की, कोलकाता हे एक किनारपट्टीवर वसलेलं शहर आहे. त्यामुळे या शहरात वर्षभर प्रचंड उष्णता असते. हवामान दमट असून हवेत मोठ्या प्रमाणात आद्रता असते. पांढऱ्या रंगाचं वैशिष्ट म्हणजे तो सूर्य किरणांना परावर्तित करतो आणि उष्णतेपासून तुमचं संरक्षण करतो, त्यामुळेच कोलकातामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील तेथील पोलीस आजही पांढऱ्या रंगाचीच वर्दी घालतात. मात्र देशातील इतर भागांमध्ये पोलीस खाकी वर्दी घालतात. अगदी पश्चिम बंगालच्या इतर भागांमध्ये देखील खाकी वर्दीच घातली जाते. फक्त कोलकाता पोलीस हेच पाढंरी वर्दी घालतात.

Follow Us
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच