AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाच्या S-400 ने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले, मग यूक्रेनचे ड्रोन हल्ले का रोखता आले नाही?

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्ताने भारतावर हल्ला केला. यावेळी भारताच्या S-400 प्रणालीने सर्व हल्ले परतवून लावले. पण यूक्रेनच्या हल्ल्यात S-400 प्रणाली का काम करु शकली नाही?

रशियाच्या S-400 ने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले, मग यूक्रेनचे ड्रोन हल्ले का रोखता आले नाही?
| Updated on: Jun 02, 2025 | 11:36 AM
Share

यूक्रेनने रशियावर तीन वर्षातील सर्वात मोठा हल्ला केला. या हल्ल्यात रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. भारत-पाकिस्तान तणावा दरम्यान भारताने रशियाची S-400 हवाई संरक्षण प्रणाली वापरली होती. या प्रणालीमुळे पाकिस्तानचे सर्व हल्ले भारताने परतवून लावले. मग युक्रेनच्या हल्ल्यात रशियाची ही S-400 प्रणाली काम का करु शकली नाही? यूक्रेनचे ड्रोन हल्ले का रोखू शकली नाही? हे प्रश्न निर्माण झाले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्ताने भारतावर हल्ला केला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना आणि भुज या ठिकाणी ड्रोन हल्ले झाले. भारतीय हवाईदलाने S-400 प्रणालीचा वापर करत हे हल्ले निकामी केले. या प्रणालीने पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट केले. भारतात यशस्वी ठरलेली रशियाची S-400 प्रणाली यूक्रेनचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले थांबवू शकली नाही.

असे झाले होते हल्ले

  • ऑगस्ट 2023: युक्रेनने क्रीमियामधील S-400 बॅटरी नष्ट केली. त्यासाठी R-360 नेपच्यून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा उपयोग करण्यात आला.
  • ऑक्टोंबर 2023: युक्रेनच्या विशेष पथकाने बेर्डियान्स्क आणि लुहान्स्कमधील दोन S-400 प्रणाली नष्ट केली. एप्रिल 2024: युक्रेनने क्रीमियामध्ये ATACMS क्षेपणास्त्राने S-400 चे चार लॉन्चर, तीन रडार आणि हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली.
  • जून 2024: बेलगोरोडमध्ये युक्रेन HIMARS रॉकेटने S-400 प्रणाली उद्ध्वस्त केली.
  • नोव्हेंबर 2024: कुर्स्क क्षेत्रमध्ये यूक्रेनने ATACMS क्षेपणास्त्राने S-400 प्रणाली लक्ष्य केले.
  • जानेवारी 2025: युक्रेनी HIMARS क्षेपणास्त्राने S-400 चे 96L6E रडार नष्ट केले.
  • यूक्रेनने आतापर्यंत कमीत कमी 31 S-400 प्रणाली नष्ट केली किंवा तिचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.
  • रशियासाठी हा मोठा झटका आहे. कारण S-400 बॅटरीची किंमत 200 मिलियन डॉलर (जवळपास 1700 कोटी रुपये) आहे.

रशियात S-400 का ठरली अपयशी

  • अप्रभावी तैनाती: रशियाने अनेकदा कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या (जसे की पँटसिर किंवा टोर) समर्थनाशिवाय केवळ S-400 तैनात केले. यामुळे ड्रोनसारख्या कमी उंचीच्या लक्ष्यांना रोखणे कठीण झाले.
  • युक्रेनची रणनीती: युक्रेनने S-400 नष्ट करण्यासाठी एक रणनीती तयार केली. ते प्रथम ड्रोनच्या रडार आणि अँटेनाला लक्ष्य करतात, नंतर क्षेपणास्त्रांनी हल्ला करतात.
  • इलेक्ट्रॉनिक युद्ध: युक्रेनने इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रांचा वापर करून S-400 चे रडार सिग्नल जाम केले. यामुळे सिस्टम लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकली नाही.
  • ड्रोनची संख्या: युक्रेनने शेकडो स्वस्त ड्रोन वापरले. शाहेद-136 किंवा DIY ड्रोन, जे S-400 ला ओव्हरलोड करतात. मे 2025 मध्ये मॉस्कोवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी शेकडो ड्रोनने S-400 ला चकमा दिला होता.
  • रशियाचा निष्काळजीपणा: रशियाने S-400 च्या संरक्षणासाठी वारंवार स्थलांतर किंवा डमी सिस्टीम यासारख्या उपाययोजना केल्या नाहीत. त्याचा फायदा युक्रेनने घेतला.

भारताच्या यशाचे राज

  • बदल : भारताने S-400 प्रणाली आपल्या तंत्रज्ञानासोबत अपग्रेड केले. जसे पेचोरा क्षेपणास्त्र प्रणालीत आधी करण्यात आले होते.
  • मल्टी-लेव्हल संरक्षण: भारताने S-400 सोबत कमी टप्प्यासाठी MANPADS आणि SHORADS तैनात केले. ज्या ड्रोन आणि कमी उंचीवरील धोके टाळता आले.
  • प्रशिक्षण आणि धोरण: भारतीय लष्कराने S-400 प्रणालीचा वापर करणाऱ्या ऑपरेटरांना कठोर प्रशिक्षण दिले.
  • मर्यादीत हल्ले: पाकिस्तानकडून मर्यादीत (50+ ड्रोन) हल्ले करण्यात आले. परंतु यूक्रेनकडून शेकडो ड्रोन हल्ले झाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.