समोसा आणला नाही, म्हणून बायकोने नवऱ्याला बेदम हाणला..
नवरा आणि बायकोची भांडणं तर संसारात होतच असतात. काय भांडणांनंतर पुन्हा ते एकत्र नांदत असतात. परंतू समोसा आणला नाही म्हणून एकाला त्याच्या पत्नीने माहेरची माणसे आणून बेदम चोपल्याची घटना घडली आहे.

बायकोचा हट्ट पुरवण्यात अनेक राजे आपली गादी आणि साम्राज्य गमावून बसले आहेत. असाच एका नवरोबाला त्याच्या बायकोने केलेला समोसा खाण्याचा हट्ट न पुरवल्याने सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या नवरोबाच्या धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणात पीडीत पतीने सून आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे अजब प्रकार घडला आहे. येथे एका पतीला किरकोळ कारणासाठी बेदम मारहाण झाली आहे. शिवम याला त्याची पत्नी संगिता हिला समोसा आणून दिला नाही म्हणून सासरच्या मंडळींनी बेदम चोपले आहे. या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकरणातील नेमकी हकीकत अशी की पिलीभीत पुरनपुर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाव भगवंतापुरात राहणाऱ्या शिवम याची पत्नी संगिता हीने पतीला यासाठी चोपले कारण त्याने समोसा खायला दिला नाही. त्याचे झाले काय २९ ऑगस्टच्या सायंकाळी तिने पती शिवमला गरमागरम समोसे आणायला सांगितले.शिवमने रस्त्यात पैसे पडल्याने आपण समोसा आणला नसल्याचे सांगितले.
मोठा वाद झाला
समोसे न आणल्याने पती आणि पत्नी मोठा वाद झाला त्यामुळे जेवण केले नाही. संगिताने तिच्या घरी तिची मावशी सरला, विमला आणि काका राम अवतार, धनीराम आणि अन्य नातलगांना बोलावून घेतले.त्यानंतर सगळ्यांनी मिळून शिवमला बेदम हाणले. त्याचा मेहुणा रामकरण आणि सासू विजय कुमार यांनीही हात साफ करुन घेतला.
या घटनेनंतर गावातील जाणत्या लोकांनी गावचे मुखिया अवधेश शर्मा यांच्या घरी पंचायत बोलावली. तेव्हा पुन्हा संगिताच्या माहेरच्या लोकांनी शिवम आणि त्याच्या कुटुंबावर हल्लाबोल केला. त्यांनी पट्ट्यांनी शिवमला चोपले. त्यात शिवम सह त्याच्या मेहुण्यास जबर मार बसला आहे.
पोलिसात तक्रार
या प्रकरणानंतर पोलिसांनी संगिता, मावशी सरला आणि विमला, काका रामअवतार, धनीराम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुरनपुर कोतवाली पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहे.
