AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीनं रागाच्या भरात कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट, नंतर पिलं अ‍ॅसिड, शहर हादरलं

धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे, पत्नीनं आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे, नंतर तीने देखील अ‍ॅसिड पिलं आहे.

पत्नीनं रागाच्या भरात कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट, नंतर पिलं अ‍ॅसिड, शहर हादरलं
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 28, 2025 | 8:06 PM
Share

उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पती-पत्नीमध्ये काही कारणामुळे भांडण झाले. भांडणानंतर संतापलेल्या पत्नीने धक्कादायक पाऊल उचललं, तीने आधी पतीचा प्रायव्हेट पार्ट धारदार हत्यारानं कापला, त्यानंतर तीने अ‍ॅसिड पिलं, या घटनेत दोन्ही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

हे प्रकरण संभल जिल्ह्यातल्या असमोली पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या एका गावामध्ये घडलं आहे. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर पत्नीने धक्कादायक पाऊल उचललं आहे.पत्नीने आधी धरादार शस्त्रानं आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला, त्यानंतर तिने अ‍ॅसिड पिलं, या घटनेनंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना 21 मे रोजी घडली आहे. दरम्यान आता या प्रकरणात पत्नीने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार पतीने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे, तर दुसरीकडे या महिलेच्या भावानं हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि बळजबरी अ‍ॅसिड पिऊ घातलं अशी आपल्या बहिणीच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या भावानं दिलेल्या तक्रारीनुसार पाच लोकांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसरीकडे पतीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित महिलेविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पती-पत्नीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमकं काय घडलं होतं? या प्रकरणात चूक कोणाची होती? याबाबतच सत्य लवकरच समोर येईल, आम्ही या पती-पत्नीची चौकशी सुरू केली आहे, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

प्रकरणानं खळबळ 

दरम्यान या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, पत्नीनं रागाच्या भरात चक्क आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे, तर समोर आलेल्या माहितीनुसार तिने स्वत: देखील अ‍ॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, या घटनेत ते दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी