कोरोना पुन्हा कहर करणार? KP.1 आणि KP.2 प्रकार किती धोकादायक

जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या प्रकाराने कहर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचा हा नवा प्रकार भारतात देखील दाखल झाला आहे. भारतात दाखल झालेल्या कोरोनाच्या प्रकारामुळे किती धोका आहे जाणून घ्या.

कोरोना पुन्हा कहर करणार? KP.1 आणि KP.2 प्रकार किती धोकादायक
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 10:30 PM

कोरोनाने कहर केल्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचा KP.1 आणि KP.2 हा नवीन प्रकार आता वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढत आहे. सरकार यावर लक्ष ठेवून आहे. या प्रकाराच्या लागणमुळे अजून गंभीर आजार किंवा मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याची पुष्टी झालेली नाही.

कोणतेही गंभीर लक्षण नाही

दिल्ली एम्सच्या कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर सांगतात की, कोरोना व्हायरसचे उत्परिवर्तन होत राहतात. पुढे ही नवनवीन रूपे येत राहतील. प्रकरणांमध्ये चढ-उतार होतील. पुढील 50 वर्षांपर्यंतही असे होऊ शकते. संसर्ग होण्याची तीव्रता किंवा मृत्यू दर वाढतोय की नाही यावर लक्ष ठेवावे लागेल. याची लागण झालेल्या लोकांना सामान्य सर्दी आहे. त्यापेक्षा कोणतेही गंभीर लक्षण दिसत नाहीत. त्यामुळे घाबरण्याची किंवा रणनीती बदलण्याची गरज नाही.

भारतात KP.1 आणि KP.2 व्हायरस दाखल

केवळ भारतातच नाही तर जगातील विविध देशांमध्येही कोरोनाचा रुग्ण वाढत आहे. हा नवीन प्रकार अनेक देशात पसरतो आहे. भारतात KP.1 आणि KP.2 ची 300 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, KP.1 आणि KP.2 हे Omicron च्या JN.1 उप-वंशातील उत्परिवर्तनामुळे अस्तित्वात आले आहेत.

चिंता करण्याची गरज नाही

या प्रकारामुळे प्रकरणे वेगाने वाढू शकतात. परंतु, आत्तापर्यंत या दोन नवीन उत्परिवर्तनांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या इतकी नाही की त्यामुळे चिंता वाढेल. यामुळे मृत्यूदरात ही कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. या प्रकारामुळे इन्फेक्शन होत आहे पण त्यात कोणतीही तीव्रता नाही. कोरोनाच्या या नवीन स्वरूपामुळे आणि प्रकारामुळे नक्कीच चिंता वाढली आहे, परंतु आतापर्यंत त्याचे वर्तन असे नाही की तो एक समस्या बनेल. पण तरीही नजर आणि देखरेख ठेवली जात आहे.

Non Stop LIVE Update
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.