AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रावर मानवी वस्ती निर्माण होणार? भारताच्या इस्त्रोची पुढील योजना, चांद्रयान 4 च्या लाँचिंगची तयारी

चांद्रयान - 3 मोहिमेच्या ऐतिहासिक यशानंतर भारताची अंतराळ संस्था इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आता चांद्रयान - 4 पाठवण्याची तयारी करत आहे. 2028 मध्ये चांद्रयान - 4 पाठवले जाणार आहे. या मोहिमेद्वारे चंद्रावरून खडक आणण्यात येणार आहेत.

चंद्रावर मानवी वस्ती निर्माण होणार? भारताच्या इस्त्रोची पुढील योजना, चांद्रयान 4 च्या लाँचिंगची तयारी
chnadrayan 4Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Feb 28, 2024 | 11:35 PM
Share

नवी दिल्ली | 28 फेब्रुवारी 2024 : चांद्रयान – 3 ला मिळलेल्या यशामुळे इस्रोच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत. त्यामुळेच आता इस्त्रोने चांद्रयान – 4 ची तयारी सुरु केली आहे. 2028 मध्ये चांद्रयान -4 हे पाठविले जाणार आहे. या मिशनला LUPEX मिशन असे नाव देण्यात आले आहे. जर हे मिशन यशस्वी झाले तर चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने आणण्याची क्षमता असलेला भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. त्याचप्रमाणे 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचीही योजना इस्रोने तयार केली आहे. इस्रोचे स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. नीलेश देसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे.

डॉ. नीलेश देसाई यांनी सांगितले की, आपल्याकडे चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी पुढील 15 वर्षे आहेत. चांद्रयान – 4 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवले जाईल. येथून खडकाचा नमुना पृथ्वीवर आणला जाईल. जेणेकरून त्याचा सविस्तर अभ्यास करता येईल. यामुळे चंद्रावर कोणत्या प्रकारची संसाधने (जसे पाणी) आहेत हे कळेल. यामुळे भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती निर्माण होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

चांद्रयान-4 चंद्रावर 350 किलो वजनाचा रोव्हर घेऊन जाणार आहे. चांद्रयान – ३ सोबत पाठवलेल्या रोव्हरपेक्षा जास्त अंतर शोधण्यात सक्षम असणार आहे. हे रोव्हर अद्याप अज्ञात असलेल्या चंद्र विवरांच्या धोकादायक कडांची तपासणी करेल. चांद्रयान-4 कदाचित भारताच्या हेवी-लिफ्ट GSLV Mk III किंवा LVM3 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

चंद्रावरील नमुने सुरक्षितपणे मिळवणे. ते पृथ्वीवर आणणे यावर या मोहिमेचे यश अवलंबून आहे. तांत्रिकदृष्ट्या ते अत्यंत आव्हानात्मक आहे. यासाठी दोन लॉन्चची आवश्यकता असेल. पहिले प्रक्षेपण पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने आणि दुसरे प्रक्षेपण चंद्रापासून पृथ्वीच्या दिशेने असणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

चांद्रयान – 4 चे लँडिंग चांद्रयान – 3 प्रमाणेच असेल. त्याचे मध्यवर्ती मॉड्यूल ऑर्बिटिंग मॉड्यूलसह ​​डॉक केल्यानंतर परत येईल. पृथ्वीच्या वर ते वेगळे होईल आणि पुन्हा वातावरणात प्रवेश करेल. इस्रोने विक्रमसोबत हॉपचा प्रयोग यापूर्वीच केला आहे. यावरून इस्त्रोचे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावरून उंच भरारी घेऊ शकते हे दिसून येते असे त्यांनी सांगितले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.