महिलेनं घेतलं कुत्रं दत्तक, केली डीएनए टेस्ट, रिपोर्ट समोर येताच प्रचंड हादरली, बसला मोठा धक्का
एका महिलेनं चक्क दत्तक घेतलेल्या आपल्या श्वानाची डीएनए टेस्ट केल्याचं समोर आलं आहे, टेस्टचे रिपोर्ट पाहाताच या महिलेला प्रचंड धक्का बसला.

आजकाल परदेशात डीएनए टेस्ट करणं ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. कारण लोकांना आपल्या नात्यांवर भरोसा राहिला नाही. याच कारणामुळे डीएनए टेस्ट करण्याचं प्रमाण वाढत आहे. कधी-कधी असा प्रसंग येतो की, डीएनए टेस्ट केली जाते, आणि तुमच्या समोर धक्कादायक रिपोर्ट येतात, यामुळे तुम्हाला प्रचंड धक्का बसतो, अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र इथे माणसाचा नाही तर एका महिलेनं चक्क आपल्या श्वानाची डीएनए टेस्ट केली आहे, या महिलेनं ज्या कुत्र्याची डीएनए टेस्ट केली, त्या कुत्र्याला या महिलेनं दत्तक घेतलं होतं. या कुत्र्यामध्ये या महिलेला अशा काही गोष्टी दिसून आल्या, ज्यामुळे तिला संशय आला, आणि तिने त्याची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. डीएनए टेस्टचा रिपोर्ट पाहून या महिलेचा प्रचंड धक्का बसला. नेमका काय आहे प्रकरण? जाणून घेऊयात.
एका महिलेनं एक कुत्रा दत्तक घेतला, त्याचं नाव तीने बेलिंडा ठेवलं. या महिलेनं दोन महिन्यांपूर्वी हा श्वान दत्तक घेतला होता. या महिलेनं आपल्या कुत्र्याच्या प्रजातीबद्दल माहिती करून घेण्यासाठी त्याची डीएनए टेस्ट केली, तेव्हा या महिलेला प्रचंड धक्का बसला. याबाबत महिलेनं बोलताना म्हटलं की, मी हा कुत्रा एका प्राणी केअर संस्थेकडून दत्तक घेतला होता, हा एक भटका श्वान आहे, तो आम्हाला जखमी अवस्थेमध्ये आढळून आला, आणि तो ‘बॉर्डर कोली’ नावाच्या प्रजातीचा आहे, अशी माहिती मला या संस्थेकडून देण्यात आली होती, मी या कुत्र्याला दत्तक घेतलं आणि घरी घेऊन आले, असं या महिलेनं सांगितलं.
पुढे बोलताना ती म्हणाली की, मला या संस्थेकडून माहिती मिळाली होती की हा कुत्रा बॉर्ड कोली प्रजातीचा आहे, मात्र बॉर्डर कोली प्राजातीचे कुत्रे हे प्रचंड चपळ, रागीट असतात, पाहाताच क्षणी कोणालाही भीती वाटावी असा त्यांचा स्वभाव असतो, मात्र मी घरी जो कुत्रा आणला होता, तो प्रचंड शांत होता, त्यामुळे मला संशय आला की या कुत्र्याला काही अनुवंशिक आजार असावा किंवा हा श्वान मिक्स ब्रीडचा असावा. म्हणून मी त्याची डीएनए टेस्ट केली.
रिपोर्ट पाहून मला प्रचंड धक्काच बसला, कारण डीएनए रिपोर्टनुसार हा कुत्रा शुद्ध बॉर्डर कोली जातीचा होता, मात्र असं असूनही तो खूपच शांत होता. त्याच्याकडे पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही की हा बॉर्डर कोली प्रजातीचा कुत्रा आहे, असं या महिलेनं म्हटलं आहे, या महिलेनं सोशल मीडियावर आपली ही पोस्ट शेअर केली आहे, जे श्वानप्रेमी आहेत, त्यांना माहिती मिळावी हा या पोस्टचा उद्देश असल्याचं या महिलेनं म्हटलं आहे.
