आईने सहा वर्षीय मुलाला पहाटे बाथरुममध्ये नेलं, पाय बांधले आणि गळा घोटला, केरळच्या महिलेचं भयानक कृत्य

केरळच्या पलक्कड भागात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे (woman killed six year old son in Kerala)

आईने सहा वर्षीय मुलाला पहाटे बाथरुममध्ये नेलं, पाय बांधले आणि गळा घोटला, केरळच्या महिलेचं भयानक कृत्य

तिरुअनंतपुरम : केरळच्या पलक्कड भागात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण केरळ हादरलं आहे. एका महिलेने स्वत:च्या सहा वर्षीय बाळाची हत्या केली. विशेष म्हणजे आरोपी महिला ही एका मदरश्याची शिक्षिका आहे. तिने अंधश्रद्धेतून हे कृत्य केल्याची शक्यता आहे. आपला एक मुलगा परमेश्वराला समर्पित करण्यासाठी अशाप्रकारचं कृत्य केल्याची कबुली तिने दिली आहे. संबंधित महिला सध्या गर्भवती आहे. तिला तीन मुलं होती. यापैकी सर्वात लहाण तिसऱ्या मुलाची तिने हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण केरळमध्ये खळबळ उडाली आहे (woman killed six year old son in Kerala).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना ही रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. निष्पाप बालक आपल्या आईसोबत अंथरुणावर झोपला होता. त्याची आई त्याला बाथरुममध्ये घेऊन गेली. तिने आपल्या मुलाचे पाय बांधले. त्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या केली. घटना घडली तेव्हा महिलेचा पती सुलेमान दुसऱ्या खोलीत झोपला होता. त्यामुळे त्याला कोणताही आवाज आला नाही.

आरोपी महिलेचं वय 30 वर्ष आहे. तिने आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वत: पोलिसांना फोन करुन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याशिवाय तिने नातेवाईकांनाही सांगितलं. अल्लाहसाठी मुलाचं बलिदान दिलं, असं महिलेने पोलिसांना सांगितलं (woman killed six year old son in Kerala).

महिलेने अशा प्रकारचं पाऊल का टाकलं? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. काही लोकांच्या मते, तिने अंधश्रद्धेला बळी पडून अशा प्रकारचं कृत्य केल्याचं म्हटलं. मात्र, महिलेच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने संबंधित परिवार अंधश्रद्धेला बळी पडणारं नाही, असं स्पष्ट केलं.

आरोपी महिलेने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. तिच्याविरोधात हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर सविस्तर चर्चा केल्यानंतर इतर कलम लावू, असं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा : ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं; जितेंद्र आव्हाडांची टीका

Published On - 4:51 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI