AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुलींना कुणातरी सोबत झोपावं लागतं तर मुलांना… काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुलांना लाच द्यावी लागते. एका मंत्र्याने एका मुलीला नोकरी पाहिजे असेल तर माझ्यासह झोपावे लागेल अशी मागणी केल्याचे समोर आले आहे. ही बाब समोर येताच त्यांनी राजीनामा दिला. मी करत असलेल्या आरोपाचा हा पुरावा असल्याचे खर्गे म्हणाले.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुलींना कुणातरी सोबत झोपावं लागतं तर मुलांना... काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
| Updated on: Aug 13, 2022 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : देशात सध्या बेरोजगारीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत अशातच अनेक ठिकाणी नोकर भरती दरम्यान मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पाहायला मिळत आहे. कर्नाटकातही नोकर भरती घोटाळा(corruption in Karnataka) उघडकीस आला आहे. या घोटाळ्याची चौकशी सुरू असताना कर्नाटकातील एका मोठ्या काँग्रेसने एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुलींना कोणातरी सोबत झोपावं लागतं तर मुलांना मोठ्या प्रमाणात लाच द्यावी लागते असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते प्रियांक खर्गे( Priyank Kharge) यांनी केले आहे. त्यांच्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रियांक खर्गे हे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आणि आमदार आमदार आहेत. त्यांनी नोकरीच्या शोधात असलेल्यांबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. नोकरी मिळवण्यासाठी मुलांना लाच द्यावी लागते तर मुलींना सरकारी नोकरीसाठी कुणाकडे तरी झोपावे लागते असं वक्तव्य करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कथित नोकरभरती घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेत्याने केली. अशा प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करावी आणि सरकारने जलदगती न्यायालये स्थापन करावीत, असे ते म्हणाले.

भाजपसह अनेक सरकारी पदांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रियांक खर्गे यांनी केला आहे. सरकारने पदे विकण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींना सरकारी नोकरी हवी असेल तर त्यांना कुणाकडे तरी झोपावे लागते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुलांना लाच द्यावी लागते. एका मंत्र्याने एका मुलीला नोकरी पाहिजे असेल तर माझ्यासह झोपावे लागेल अशी मागणी केल्याचे समोर आले आहे. ही बाब समोर येताच त्यांनी राजीनामा दिला. मी करत असलेल्या आरोपाचा हा पुरावा असल्याचे खर्गे म्हणाले.

केपीटीसीएलच्या नोकरभरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (KPTCL) ने सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंता अशा एकूण 1,492 पदांची भरती सुरु केली आहे. गोकाक येथील एका विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान ब्लूटूथ वापरताना पकडले गेले. एकूण 600 पदांसाठी आधीच उमेदवारांकडून लाच घेण्यात आली आहे. सहायक अभियंता पदासाठी 50 लाख, कनिष्ठ अभियंता पदासाठी 30 लाख रुपये घेतल्याचा संशय आहे. या प्रकारे या नोकर भरतीत तब्बल 300 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.