अवघ्या काही तासांत होणार मलिकच्या शिक्षेचा फैसला; एक बूथ लिडर ते जम्मू काश्मीरच्या दहशतवाद्यांचा आका; कोण आहे यासीन मलिक?

यासीन मलिक हा काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवने, दहशवादी कृत्यात हात असणे तसेच अशांतता निर्माण केल्या प्रकरणात दोषी आढळून आला आहे. आज त्याला शिक्षा सुणावण्यात येणार आहे.

अवघ्या काही तासांत होणार मलिकच्या शिक्षेचा फैसला; एक बूथ लिडर ते जम्मू काश्मीरच्या दहशतवाद्यांचा आका; कोण आहे यासीन मलिक?
यासीन मलिक
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 2:08 PM

नवी दिल्ली : तारीख होती 13 ऑक्टोबर 1983 जम्मू- काश्मीरच्या श्रीनगरमध्ये (Srinagar) शेर-ए- काश्मीर स्टेडियमवर भारत विरूद्ध वेस्ट इंडीजदरम्यान क्रिकेट मॅच सुरू होती. याच दरम्यान ब्रेकमध्ये काही जण मैदानात घुसले आणि मैदान खराब करून लागले. या प्रकरणात बारा लोकांना अटक करण्यात आली होती. हे काम ज्या संघटनेने केले होते, त्या संघटनेचे नाव होते ‘ताला पार्टी’ (tala party) त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी 13 जुलै 1985 ला ख्वाजा बाजारमध्ये नॅशन कॉन्फ्रेंसची रॅली होती. या रॅलीमध्ये सत्तर तरुण सहभागी झाले. त्यांनी या रॅलीमध्ये फटाके फोडले. मात्र बॉम्बस्फोटाच्या अफवेने गोंधळ उडाला. या प्रकरणात एका तरुणाला अटक करण्यात आली त्याचे नाव होते यासीन मलिक (Yasin Malik). यासीन मलिक तेव्हा 19 वर्षांचा होता. हा तोच यासीन मलिक आहे ज्याने नंतर जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद वाढवला. जम्मू-काश्मीरच्या स्वतंत्र्याची मागणी करत राहिला. बंदूक आणि बॉम्बच्या धाकाने काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. आज त्याच यासीन मलिकला शिक्षा सुणावण्यात येणार आहे. अवघ्या काही तासांमध्ये त्याला शिक्षा सुणावली जाईल. काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणे, दहशवादी कृत्यात हात असणे तसेच अशांतता निर्माण केल्या प्रकरणात तो दोषी आढळून आला आहे.

17 वर्षांचा असताना पहिल्यांदा जेल

यासीन मलिक हा सध्या तिहार जेलमध्ये आहे. तो जेव्हा पहिल्यांदा जेलमध्ये गेला होता तेव्हा त्याचे वय होते 17 वर्ष. यासीन मलिक याचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी श्रीनगरच्या मयसूमामध्ये झाला होता. मयसूमा हा जम्मू-काश्मीरमधील सर्वात वर्दळीचा परिसर आहे. यासीन मलिक याने आपल्यावरील आरोप स्व:ता मान्य केले आहेत. तो त्याने केलेल्या गुन्ह्याचे समर्थन करताना म्हणतो की, मी 80 दशकात भारतीय सैन्य दलाने जम्मू-काश्मीरमध्ये केलेला अत्याचार पाहिला होता. त्यामुळेच मी हातात शस्त्र घेतले. या कथीत हिंसाचाराला उत्तर देण्यासाठी जी संघटना यासीन मलिक याने बनवली होती, त्याला त्याने ताला पार्टी असे नाव दिले होते. ही पार्टी राज्यात कायमच अशांतता पसरवण्याचे काम करत होती.

मकबूल भटच्या फाशीचा विरोध

याच दरम्यान 11 फेब्रुवारी 1984 ला दहशतवादी मकबूल भट याला फाशी झाली. ताला पार्टीकडून या फाशीचा जोरदार विरोध करण्यात आला. मकबूल भट यांच्या समर्थनार्थ काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पोस्टरबाजी करण्यात आली होती. तेव्हा देखील मलिकला अटक करण्यात आली होती. चार महिन्यानंतर त्याची जेलमधून सुटका झाली. जेलमधून सुटल्यानंतर त्याने आपल्या पार्टीचे नाव बदलून 1986 साली इस्लामिक स्टुडंट लीग ‘आयएसएल’ ठेवले. मलिक या संघटनेचा महासचिव बनला तर अखफाक मजीद वानी, जावेद मीर आणि अब्दुल हामीद शेख हे या पार्टीचे सदस्य होते. काश्मीरला स्वातंत्र्याची मागणी वारंवार या संघटनांकडून करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

बूथ नेता ते दहशतवादी

सात मार्च 1986 मध्ये केंद्रात राजीव गांधी यांचे सरकार सत्तेत आले. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये गुलाम मोहम्मद शेख यांचे सरकार बरखास्त करून, राज्यपाल राजवट लागू केली. त्यानंतर आठ महिन्यांनी राज्यात फारूख अब्दुल्ला आणि काँग्रेस यांची युती असलेले सरकार सत्तेत आले. दरम्यान ही विधानसभेची निवडणूक आणखी काही संघटनांनी लढवली होती. त्या संघटनांचे नाव होते, जमात-ए-इस्लामी आणि इत्तेहादुल-उल-मुसलमीन त्यांनी एकत्र येत मुस्लिम यूनाइटेड फ्रंटच्या बॅनरखाली निवडणूका लढवल्या. या निवडणुकीत श्रीनगरच्या अमीराकदल मतदारसंघातून मोहम्मद युसुफ शाह हा या संघटनेचा उमेदवार होता. यासीन मलिक याने मोहम्मद युसुफ शाहाचा जोरदार प्रचार केले. पुढे मोहम्मद युसुफ शाह याने हिजबुल मुजाहिद्दीन नावाची अतेरिकी संघटना सुरू केली.

टेरर फंडिंग प्रकरणात दोषी

मलिक हा कधी जेलमध्ये तर कधी जेलच्या बाहेर होता. तो जेलमधून सुटल्यानंतर राजकारण देखील करत होता. 2017 मध्ये एनआयएने यासीन मलिकसह अनेक लोकांवर टेरर फंडिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला. सध्या तो तिहार जेलमध्ये आहे. 19 मे 2022 रोजी तो या सर्व प्रकरणात दोषी आढळून आल्याने आज त्याला शिक्षा सुणावण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.