Earphones Blast : गाणी ऐकताना ईअरफोन कानातच फुटले, तरुणाचा जागेवर मृत्यू

राकेश नागर असं 28 वर्षीय मृत तरूणाचं नाव आहे. राकेश नेहमीप्रमाणे कानात हेडफोन घालून गाणी ऐकत होता. तेवढ्यात त्याच्या कानात हेडफोनचा स्फोट झाला. यात हेडफोनचा स्पीकर फुटला.

Earphones Blast : गाणी ऐकताना ईअरफोन कानातच फुटले, तरुणाचा जागेवर मृत्यू
कानात ईअरफोनचा स्फोट
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 12:25 PM

राजस्थान : ईअरफोन (Earphone) वापरणं आज सामान्य गोष्ट झाली आहे. गाणी ऐकण्यासाठी आणि फोनवर बोलण्यासाठी अनेकजण हमखासपणे ईअरफोनचा वापर करताना दिसतात. पण हे ईअरफोन वापरणं एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं याचा कुणी विचारही केला नसेल. राजस्थानच्या (Rajasthan) जयपूर जिह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यात तरूणाच्या कानात ईअरफोन स्फोट (Earphone Blast) झाल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. (Young man died in Rajasthan after a earphone exploded in his ear)

काय आहे घटना?

राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यात उदयपुरिया (Udaypuriya) गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. राकेश नागर (Rakesh Nagar) असं 28 वर्षीय मृत तरूणाचं नाव आहे. राकेश नेहमीप्रमाणे कानात ईअरफोन घालून गाणी ऐकत होता. तेवढ्यात त्याच्या कानात ईअरफोन स्फोट झाला. यात ईअरफोनचा स्पीकर फुटला. ईअरफोनच्या स्फोटामुळे मोठा आवाजही झाला. त्यानंतर राकेशच्या कानातून रक्त यायला लागलं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

कसा झाला ईअरफोनचा स्फोट?

मृत राकेश सकाळी लॅपटॉपवर काम करत होता. यावेळी त्याने ईअरफोन लावलेले होते. त्यावेळी अचानक लाईट गेली, आणि लाईट परत आल्यानंतर त्याच्या कानातल्या ईअरफोनचा स्फोट झाला. यावेळी घरातले इतर लोक शेतात काम करत होते. स्फोटाच्या आवाजाने घाबरून ते घराकडे पळाले तोपर्यंत राजेश जमीनीवर कोसळलेला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

ईअरफोनच्या स्फोटामुळे मृत्यू झालेल्या राकेशचं लग्न काही महिन्यांपूर्वीच झालं होतं. राकेशच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

इतर बातम्या :

BREAKING- मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल

राहुल गांधी यांचं ‘ते’ ट्विट ट्विटरने हटवले; वकिलाच्या तक्रारीनंतर कारवाई

न्यायाधीशांना धमक्या येऊनही CBI, IB आणि पोलिसांकडून मदत नाही : सर्वोच्च न्यायालय

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.