'झोमॅटो'चा आधी दुसऱ्याचे पदार्थ खातानाचा व्हिडीओ, आता नवा व्हिडीओ

मुंबई : फुड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण झोमॅटोचे कौतुक करत आहे. झोमॅटोने पहिल्यांदा एका दिव्यांग मुलाला आपल्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम दिलं आहे. राजस्थानच्या बीवर शहरातील हा व्हिडीओ आहे. दिव्यांग मुलांना सहसा काम मिळण कठीण असते. त्यामुळे त्यांच्यासाठी कमी ठिकाणी कामं उपलब्ध …

'झोमॅटो'चा आधी दुसऱ्याचे पदार्थ खातानाचा व्हिडीओ, आता नवा व्हिडीओ

मुंबई : फुड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण झोमॅटोचे कौतुक करत आहे. झोमॅटोने पहिल्यांदा एका दिव्यांग मुलाला आपल्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम दिलं आहे. राजस्थानच्या बीवर शहरातील हा व्हिडीओ आहे.

दिव्यांग मुलांना सहसा काम मिळण कठीण असते. त्यामुळे त्यांच्यासाठी कमी ठिकाणी कामं उपलब्ध असतात. पण झोमॅटोने दिव्यांग मुलाला काम देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे.  दिव्यांगांनी कोणावरही अवलंबून राहू नये हे यामागचे प्रमुख कारण आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लाल टी-शर्टमध्ये मुलगा दिसत आहे. हा मुलगा दिव्यांग असल्याने दिव्यांगासाठी असलेल्या खास सायकलमध्ये बसून तो फुड डिलिव्हरी करत आहे. हनी गोयल नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. पोस्ट करताना या व्हिडीओला एक कॅप्शन दिलं आहे. “असचं काम करत राहा, झोमॅटो हे पाहून मला चांगलं वाटलं, हा व्हिडीओ पाहून दिव्यांग मुलांच्या अपेक्षा वाढतील. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. हा व्हिडीओ सर्वांनी शेअर करा”.

काही महिन्यांपूर्वी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयमुळे कंपनीची बदनामी झाली होती. याचा मोठा फटका झोमॅटोला बसला होता. मात्र आता झोमॅटोचा हा व्हिडीओ पाहून झोमॅटोचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *