हिंदुत्वावरून पुन्हा भाजप-सेनेत ‘सामना’, पंजाबमधील घटनेवरून राजकारण तापलं

देवामुळं मोदी वाचले, कडक सुरक्षेमुळं नाही, अशी खोचक टीका, सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करण्यात आलीय.

हिंदुत्वावरून पुन्हा भाजप-सेनेत 'सामना', पंजाबमधील घटनेवरून राजकारण तापलं
मोदींचा ताफा रोखण्याचा शेतकऱ्यांनी अजिबात प्रयत्न केलेला नाही

मोदींच्या सुरक्षेवरुन पंजाबमध्ये जे काही घडलं, त्यावरुन दिवसेंदिवस राजकारण तापतंय. आणि आता शिवसेनेनं सामनातून मोदींना खोचक टोले लगावलेत. देवामुळं मोदी वाचले, कडक सुरक्षेमुळं नाही, अशी खोचक टीका, सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करण्यात आलीय. पंजाबमध्ये मोदींचा ताफा आंदोलकांनी रोखला. त्यानंतर मोदींही संतापले. आपण जीवंत परतो हे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा, असं मोदी भटिंडा विमानतळावरील अधिकाऱ्यांना बोलले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी मोदींच्या दीर्घायुष्यासाठी मंदिरांमध्येही पूजाही केली. याचवरुन सामनातून शिवसेनेनं मोदींना डिवचलंय.

सामनातल्या आग्रलेखातून काय कोपरखळ्या?

देशाचं नेतृत्व करणाऱ्या अनेकांना कधी ना कधी धोकायदायक प्रसंगांना जामोरे जावं लागलेच आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबतीत पंजाबात जे घडले ते चिंताजनक, तितकेच धक्कादायक आहे. देवाच्या कृपेने मोदी सुखरुप परत आले म्हणून देवांचे आभार. मोदी यांना सुरक्षित जीवन लाभावे यासाठी उत्तर प्रदेश, आसामचे मुख्यमंत्री मंदिरात पूजेला बसल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. एकंदरित संपूर्ण देशच अशा पद्धतीने ईश्वरपूजेत मग्न झाल्याने आपण सगळेच अध्यात्माच्या शेवटच्या बिंदूला पोहोचल्याचं स्पष्ट झाले आहे. हे सर्व कशासाठी तर पंजाबात पंतप्रधान मोदी यांच्या जिवावरच बेतले होते, पण देवाच्या कृपेने ते वाचले म्हणून. मोदी यांच्या भोवती असलेले अभेद्य सुरक्षा कवच, प्रशिक्षित एसपीजी कमांडो, प्रचंड सुरक्षा दल, अत्याधुनिक बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्या घोडे, यामुळं नव्हे तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले व पंजाबातून सुखरुप दिल्लीत परत आले. असा टोला सामनातून लावण्यात आला आहे.

इकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवलंय…मोदींचा ताफा रोखण्यात आला, तिथं भाजपचे कार्यकर्ते कसे पोहोचले ? असा सवाल पटोलेंनी केलाय. मोदींचा ताफा रोखण्यामागं कोण ? याचा शोध केंद्रीय तपास यंत्रणा घेत आहेत. पण भाजपच्या नेत्यांच्या मंदिरांमधल्या पूजेवरुन शिवसेनेनं टीकेची संधी साधली खरी. मात्र त्यानंतर शिवसेनेवरच हिंदुत्वावरुन पलटवार झालाय.

Vastu tips : घरात सुख- शांती नांदावी असे वाटत असेल तर घरातील भिंती रंगवा “या” रंगांनी…!

Video | तुफान बर्फवृष्टीत भारतीय जवानांची गरोदर महिलेला मदत, खांद्यावर उचललं आणि चालू लागले!

कोणी निर्माण केले होते आताचे सोमनाथ मंदिर? वाचा अनेकदा उध्वस्त केलेल्या या मंदिराच्या वैभवाची कहाणी

Published On - 9:50 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI