VIDEO: नवाब मलिकांच्या घरी ‘पाहुणे’ येणार का? पाहुण्यांनी मला सांगावं, मीच ईडीमध्ये येईल: मलिक

समीर वानखेडे प्रकरणांवरुन भाजप नेत्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या नवाब मलिकांमागे आता तपास यंत्रणा मागे लागणार असल्याचे दावे होतायत...

VIDEO:  नवाब मलिकांच्या घरी पाहुणे येणार का? पाहुण्यांनी मला सांगावं, मीच ईडीमध्ये येईल: मलिक
nawab malik
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 10:48 PM

मुंबई: समीर वानखेडे प्रकरणांवरुन भाजप नेत्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या नवाब मलिकांमागे आता तपास यंत्रणा मागे लागणार असल्याचे दावे होतायत… खुद्द नवाब मलिकांनीच ट्विट करुन आपल्याकडे सरकारी पाहुणे येणार असल्याचं भाकीत वर्तवलंय…

सोमय्यांचा दावा आहे की नवाब मलिकांनी पुण्यात वक्फ बोर्डात घोटाळा केलाय. मात्र कोणत्याही चौकशी सामोरं जायला तयार असल्याचा दावा मलिक करतायत.. एकीकडे नवाब मलिक सोमय्यांना ईडीचे प्रवक्ते म्हणत असताना काल पहिल्यांदाच ईडी आणि आयकरच्या कारवायांवरुन सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला काही प्रश्न केले…

तूर्तास मलिकांमागे ईडीचा फेरा फडतो का, आणि जर चौकशी लागली., तर त्याला उत्तर म्हणून नवाब मलिक भाजपच्या कोणत्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार, याबाबत चर्चा सुरु आहेत…

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. सोमय्या तुम्ही मी वक्फ बोर्डाची जमीन हडप केली असे सांगत आहात. मी जमीन हडप केलेली नाही. मात्र आगामी काळात पुण्यातील दोन एफआयआरमध्ये वक्फची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांवर एफआयआर दाखल होणार आहे. त्यांना लवकरच अटक होईलच. मात्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीनी भाजप नेत्यांनी लाटल्या आहेत त्यांना सोडणार नाही, असा इशारा देतानाच आता या नेत्याना ईडी बोलावते का हे पाहणार आहे, असे सूचक विधान मलिक यांनी केलं.

ईडीने ऑफिशियल बातमी दिली पाहिजे. वक्फ बोर्डाबाबत कोणती केस नोंदविण्यात आली? त्यात काय प्रगती झाली? त्यात कोण आरोपी होऊ शकतात? याची रितसर माहिती द्या असे पत्राद्वारे विचारणा करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

VIDEO: ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का?; नारायण राणे यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी बनले हिंदूंच्या आस्थेचा चेहरा, कोणत्या मंदिरांच्या निर्माण कार्यात मोदींचं मोठं योगदान?

राज्यात मविआ सरकारनं अराजक माजवलं, ‘सामना’तील टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर