Rabindranath Tagore Birth Anniversary: गुरुदेव रवींद्रनाथ म्हणजे कविता, तत्त्वज्ञान, चित्रकला आणि संगीत अशा अनेक शैलींचा संगम

रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांना १३ भावंडे त्यामध्ये ते सर्वात लहान होते. ते लहान असतानाच त्यांचे आईचे छत्र हरवले. तर त्यांचे वडील सतत परदेश दौरे करत, त्यामुळे त्यांच्या लहानपणाची सगळी जडण-घडण ही त्यांच्या घरातील नोकरांनीच केली. म्हणून त्यांच्या साहित्यातही मानवतेची विविध रुपं दिसतात, ती यामुळेच.

Rabindranath Tagore Birth Anniversary: गुरुदेव रवींद्रनाथ म्हणजे कविता, तत्त्वज्ञान, चित्रकला आणि संगीत अशा अनेक शैलींचा संगम
गुरुदेव रवींद्रनाथ म्हणजे कविता, तत्त्वज्ञान, चित्रकला आणि संगीत अशा अनेक शैलींचा संगम Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 7:34 AM

मुंबईः या जगात काही माणसंही जन्माला येतात, त्यांचे योगदान एकाच क्षेत्राला असतं असं नाही, अनेक क्षेत्रात ती पारंगत असतात. म्हणूनच अशी माणसं जगाला सोडून गेली तरी त्यांच्या अष्टपैलू गुणांमुळे ती मृत्यूनंतरही कायम स्मरणात राहतात आणि अमर होऊन जातात. अशीच कथा आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांची. आपल्या देशातील प्रत्येत नागरिका त्यांना ओळखतो, कारण आपल्या त्यांनी भारताचे राष्ट्रगीत (National anthem) ‘जन-गण-मन’ हे त्यांचीच रचना आहे. एवढचं नाही तर त्याकाळी नोबेल पारितोषिक (Nobel Prize) मिळवणारे ते जगातील पहिले आशिया खंडातील पहिले लेखक होते.

त्यांच्या प्रतिभेमुळेच त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. टागोरांनी अनेक काव्यसंग्रह लिहिले, 2 हजारांहून अधिक गाणी लिहिली, अनेक चित्रे काढली, 30 हून अधिक देशांचा प्रवास केला आहे. हे सगळं करत असताना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही आपले योगदान दिले आहे.

रवींद्रनाथ टागोर यांची बालपणातील जडण-घडण:

रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांना १३ भावंडे त्यामध्ये ते सर्वात लहान होते. ते लहान असतानाच त्यांचे आईचे छत्र हरवले. तर त्यांचे वडील सतत परदेश दौरे करत, त्यामुळे त्यांच्या लहानपणाची सगळी जडण-घडण ही त्यांच्या घरातील नोकरांनीच केली. म्हणून त्यांच्या साहित्यातही मानवतेची विविध रुपं दिसतात, ती यामुळेच.

शाळेत रमले नाहीत

रवींद्रनाथ टागोरांचे मन शाळेत कधी रमले नाही, त्यांना फिरायलाच जास्त आवडे. त्यांच्या या फिरण्यामुळे शाळेकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने त्यांचा भाऊ हेमेंद्रनाथने टागोरांना शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना जिम्नॅस्टिक्स, ज्युडो-कराटे, पोहणे अशा शारीरिक क्रियांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. हे करत असताना त्यांना इतिहास, भूगोल, गणित, शरीरशास्त्र, इंग्रजी असे अनेक विषयातही पारंगत केले.

टागोरांचा आध्यात्मिक प्रवास:

रवींद्रनाथ टागोल लहान असतानाच त्यांच्या आय़ुष्यात वेगवेगळ्या गोष्टी त्यांना शिकण्यास मिळाल्या. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांना ज्ञानप्राप्तीसाठी एक खास प्रवास घडवून आणला. ते सगळ्यात आधी शांतिनिकेतनला गेले, नंतर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गेले. त्या मंदिरातच रवींद्रनाथ टागोर तासन् तास गुरबानी ऐकत राहिले ते लहान वयातच. सुवर्ण मंदिरात काही वर्षे घालवल्यानंतर, पहाडी हिमालयाने त्यांना खुणावले.आणि तिथेही ते गेले. त्यांच्या वडिलांनी त्यांना ज्योतिष, इतिहास आणि आधुनिक विज्ञानकाची कास धरायला लावले. हे सगळं करत असताना त्यांच्या वडिलांनी रवींद्रनाथ टागोरांना रामायण आणि उपनिषदांची ओळख करुन दिली. हे शिकत असताना त्यांच्या शिक्षणातही त्यांनी खंड पडू दिला नाही, म्हणून त्यांनी पुढील शिक्षण लंडनमध्ये केले. रवींद्रनाथांनी शिकून वकील व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, पण रवींद्रनाथांना त्यात रस नव्हता.म्हणूनच त्यांनी कॉलेजला जाणेच बंद केले.

2 हजार गाण्यांचे लेखन

कॉलेजसा जाणे त्यांनी बंद केले पण त्यांनी आपला अभ्यास थांबवला नाही. कॉलेजच्या दिवसातच त्यांनी शेक्सपियरसारखे नाटककार त्यांनी वाचून काढले. वाचन करत असतानाच त्यांना संगीत ऐकण्याची गोडी लागली, म्हणून त्यांनी स्कॉटलंड, आयर्लंड आणि ब्रिटनचे संगीत ऐकण्यास सुरुवत केली. त्यामुळे संगीताची आवड निर्माण झाली. हे करत असताना त्यांनी गीतलेखनास सुरुवात केली. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली गाणी स्वामी विवेकानंदांना खूप आवडत, अशी नोंद काही ठिकाणी आहे. त्यांच्या एका परिचिताच्या लग्न समारंभात त्यांनी टागोरांनी लिहिलेले गाणेही सादर केले. त्यांच्या गीतलेखनात भारतीय शास्त्रीय संगीत, कर्नाटक संगीत आणि गुरबानींचे मिश्रण दिसते, ते त्यांच्या लहानपणीच्या जडणघडणीमुळे. त्यांच्या हयातीत त्यांनी सुमारे 2,000 गाण्यांची रचना केली आहे. त्यांच्या गाण्याचा प्रवास खूप मोठा होता आणि आहे ही. म्हणूनच किशोर कुमार यांनी गायलेले ‘छू कर मेरे मन को’ हे गाणेही रवींद्रनाथ टागोरांच्या प्रेरणेमुळेच त्याची निर्मिती झाली आहे.

रवींद्रनाथ टागोरांचा साहित्यिक प्रवास

अध्यात्मिकतेचा प्रवास, शिक्षण, गीतलेखन आणि छंद या गोष्टींमुळे त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक कलाकृतीनी एक वेगळी उंची गाठली आहे. या सगळ्या त्यांच्या अनुभवामुळेच त्यांच्या लेखनशैलीवर चांगले प्रभुत्व निर्माण झाले होते. लेखनाच्या छंदामुळेच ते साहित्यनिर्मिकडे वळले. त्यांनी कादंबर्‍या लिहल्या, तसेच अनेक लघुकथाही लिहिल्या आहेत. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे ‘काबुलीवाला’ ही कथा. ही कथा अनेकांनी शालेय पाठ्यपुस्तकात वाचली असेल. ‘गीतांजली’सारखा त्यांनी हा काव्यसंग्रहही रचल आहे. गीतांजली हा काव्यसंग्रह इंग्रजीत अनुवाद झाल्यानंतर त्यांनी जगाने त्या काव्यसंग्रहाला डोक्यावर घेतले. त्यांनी लिहिलेल्या बहुतेक कविता स्वातंत्र्य चळवळ आणि देशभक्तीसारख्या विषयांवर आधारित आहेत.

नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई

टागोरांचे साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दलच त्यांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिकाने त्यांना गौरवण्यात आले. हे नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले आशियाई बनले आहेत.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.