Special Report : ‘INS विक्रांत’ प्रकरणात राऊतांनी सोमय्यांवर केलेले आरोप सिद्ध झाले, तर त्यांनी शिक्षा किती होणार? जाणून घ्या!

माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर सोमय्यांविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. दरम्यान, सोमय्यांवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले, तर त्यांना किती शिक्षा होऊ शकते, हेही जाणून घेणं गरजेचं आहे. यावरुन नेमकी ही कलमं किती महत्त्वाची आहेत, याची कल्पना करता येऊ शकेल.

Special Report : 'INS विक्रांत' प्रकरणात राऊतांनी सोमय्यांवर केलेले आरोप सिद्ध झाले, तर त्यांनी शिक्षा किती होणार? जाणून घ्या!
INS विक्रांतवरुन संजय राऊत आणि किरीट सोमय्यांमध्ये आरोप प्रत्यारोपImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 9:59 PM

मुंबई : जवळपास दीड महिन्यांपासून, बाप-बेटे जेलमध्ये जाणार, असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) सोमय्यांना देत आहेत. आता राऊतांनी INS विक्रांतवरुन घेरल्यानंतर किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) गुन्हाही दाखल झाला. विशेष म्हणजे जी 3 कलमं सोमय्यांवर लावण्यात आली. त्यात कलम 34 चाही समावेश, याचाच अर्थ पोलिसांना अटक करण्यासाठी वॉरंटची गरज नाही. त्यामुळं सोमय्यांना अटक होणार का? अशी चर्चा सुरु झाली. 58 कोटींवरुन राऊत आणि सोमय्यांमध्ये संघर्ष सुरु झालाय. INS विक्रांतला (INS Vikrant) वाचवण्याच्या नावाखाली, सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर सोमय्यांविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. दरम्यान, सोमय्यांवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले, तर त्यांना किती शिक्षा होऊ शकते, हेही जाणून घेणं गरजेचं आहे. यावरुन नेमकी ही कलमं किती महत्त्वाची आहेत, याची कल्पना करता येऊ शकेल.

किरीट सोमय्यांसह त्यांचे पुत्र निल किरीट सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. कलम 420, कलम 406 आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांनुसार,

  1. कलम 420 अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास 7 वर्षांपर्यंत जेल आहे
  2. कलम 406 नुसार गुन्हा सिद्ध झाल्यास 3 वर्षांची शिक्षा
  3. कलम 34 अंतर्गत पोलीस अटक वॉरंट शिवाय अटक करु शकते

‘INS विक्रांत’चं प्रकरण काय?

गुन्हा दाखल केल्याप्रमाणं 58 कोटी कसे आणि कुठून आले, याची माहिती आता पोलिसांनीच सांगावी, असं सोमय्या म्हणतायत. तर आधी हिशेब द्या मग पुरावे देतो असं प्रतिआव्हान राऊतांचं आहे. 711 बॉक्स मधून सोमय्यांनी पैसे गोळा केले आणि PMC बँकेच्या माध्यमातून पैसे व्हाईट केले असा दावा राऊतांचा आहे.

2014-15 मध्ये सरकारनं INS विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढली. मात्र त्यावर मुझियम करावं, अशी मागणी झाली. त्यासाठी 200 कोटींची गरज होती. त्याचवेळी सोमय्यांनी मोहीम सुरु करुन पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र वायद्याप्रमाणं हे पैसे राजभवनात जमा झालेच नसल्याचं समोर आलंय.त्यामुळं अशा भ्रष्ट पुढाऱ्यांना आता लोकच जोडे मारतील, अशी बोचरी टीका राऊतांनी केलीय.

सोमय्यांविरोधात राज्यभरात आंदोलन

दुसरीकडे सोमय्यांविरोधात शिवसैनिकांनी महाराष्ट्रभर आंदोलनं सुरु केलीत. नाशिकमध्ये सोमय्यांचा पुतळा जाळण्यात आला…तर औरंगाबादमध्ये जोडे मारो आंदोलन करुन घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळं सोमय्या विरोधातली शिवसेनेची लढाई रस्त्यावर सुरु झालीय.

इतर बातम्या :

Imran Khan Government : इमरान खान यांची सुप्रिम कोर्टानं काढली विकेट! अविश्वास प्रस्तावाची अग्निपरीक्षा द्यावीच लागणार

Video : पंकजा मुंडेंनी तुळजाभवानीकडे मागितला कौल, मनातील इच्छा पूर्ण होणार?

Non Stop LIVE Update
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.