National Voters Day 2022: ज्या वाजपेयींना एका मताने सत्ता गमवावी लागली, त्या मताची किमत तुम्हाला माहीत आहे का?

National Voters Day 2022: आपल्या देशाने संसदीय लोकशाही स्वीकारली. एक मत एक मूल्य हे सूत्रं स्वीकारलं. मतदान प्रक्रियेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भाग घ्यावा म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टीही जाहीर केली जाते.

National Voters Day 2022: ज्या वाजपेयींना एका मताने सत्ता गमवावी लागली, त्या मताची किमत तुम्हाला माहीत आहे का?
voting
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 12:31 PM

नवी दिल्ली: आपल्या देशाने संसदीय लोकशाही (democracy) स्वीकारली. एक मत एक मूल्य हे सूत्रं स्वीकारलं. मतदान प्रक्रियेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भाग घ्यावा म्हणून मतदानाच्या (voting) दिवशी सुट्टीही जाहीर केली जाते. मात्र, लोक सुट्टीच्या दिवशीही मतदानाला घराबाहेर पडत नाहीत. अनेक लोक तर सुट्टी म्हणून पिकनिकला जातात. मतदानाचा अधिकार बजावत नाहीत आणि नंतर राज्यकर्त्यांवर टीका करतात. नागरिकांना आजही आपल्या मतांचं मूल्य कळलेलं नाही. मताची किंमत समजलेली नाही. आजही अनेक लोक मतदान करण्यासाठी कंटाळा करतात. देशाचे माजी पंतप्रधान आणि भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी (atal bihari vajpayee) यांनाही केवळ एका मताने आपली सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे मत किती महत्त्वाचं आहे हे यावरून दिसून येतं. आज राष्ट्रीय मतदार दिवस (National Voters Day 2022) असल्याने त्यानिमित्ताने घेतलेला हा संपूर्ण आढावा.

मतदार दिवस कधीपासून सुरू

25 जानेवारी 2011 पासून देशात मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ‘राष्ट्रीय मतदार दिवसाला’ शुभारंभ केला. याची सुरुवात 1950 मध्ये निवडणूक आयोगाच्या 61 व्या स्थापनेच्या दिवशी झाली. 2011 पूर्वी हा दिवस अस्तित्वात नव्हता.

म्हणून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा होतो

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. मात्र, देशातील मतदानाचा टक्का अत्यंत कमी असल्याने नागरिकांनी मतदान करावं म्हणून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. 1 जानेवारी रोजी ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत. त्या मतदारांना शोधलं जावं, त्यांची मतदार म्हणून नोंद व्हावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

अनेक कार्यक्रमांचे आयोजन

या दिवशी सरकारी आणि सामाजिक संस्थांद्वारे नागरिकांना जागरुक करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राजकीय प्रक्रियेत देशातील नागरिकांची भागिदारी राहिली पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे.

मतदार दिवस कसा साजरा होतो?

राष्ट्रीय मतदार दिवसाची एक थीम असते. या दिवशी मतदारांना जागरूक करण्यासाठी प्रत्येक सरकार जनजागृती मोहीम राबवते. जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत किंवा ज्यांची नावे मतदान यादीत नाहीत अशा नागरिकांना अधिक माहिती मिळावी म्हणूनही मोहीम राबवली जाते. निवडणूक प्रक्रियेत चांगली कामगिरी बजावणाऱ्यांना याच दिवशी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. मतदार दिवसाच्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर अभियान, नव्या मतदारांना मतदान कार्ड देणं, मतदारांच्या फोटोंचं प्रदर्शन आदी कार्यक्रम केले जातात. नव मतदारांचा शोध घेण्यासाठी, मतदारांची ओळख पटवण्यासाठी, मतदारांची संख्या जाणून घेण्यासाठी आणि मतदान करण्यास मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी मतदार दिवस साजरा केला जातो.

मतदानाचा हक्क कुणाला?

भारतीय संविधानाने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. कोणत्याही भेदभावाशिवाय त्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ज्या अनिवासी भारतीयांकडे भारतीय पासपोर्ट असतात त्यांनाही मतदानाचा अधिकार असतो.

लोकसभा मतदारसंघात किती मतदार असतात?

संविधानानुसार 10 लाख लोकसंख्येला एक खासदार असावा. मात्र, भारतात ही संख्या 25 लाख आहे. 1971 मध्ये देशातील सर्व राज्यातील लोकसंख्या कमी-जास्त असल्याने मतदारसंघ तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार देशात 30 लाख लोकसंख्येचा एक लोकसभा मतदारसंघ असं सूत्रं ठरवलं गेलं आहे. मात्र, तामिळनाडूत 20 लाख लोकांमागे एक खासदार आहे. 10 लाख लोकांमागे एक खासदार म्हणजे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 10 लाख लोकसंख्या पकडली तर देशात 1375 लोकसभा मतदारसंघ होतील. एकट्या उत्तर प्रदेशात हा आकडा 80 वरून 238 होईल. संविधानाच्या नुसार ज्या राज्यांची लोकसंख्या 6 लाखांपेक्षा कमी आहे, तिथे 10 लाखाचं सूत्रं लागू नाहीये.

एक मताचा वाजपेयींनाही फटका

1998मध्ये देशात मध्यावधी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपला 182 जागा मिळाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष बनला. भाजपने शिवसेना, अकाली दल, समता पार्टी, एआयएडीएमके आणि बिजू जनता दलाच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली. अटल बिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधानपदी बसले. जयललिता यांनी वाजपेयींवर तामिळनाडूतील एम. करुणानिधी सरकार बरखास्त करण्याचा दबाव वाढवला होता. मात्र निवडून आलेल्या सरकारला बरखास्त करणं वाजपेयींना पटत नव्हतं. त्यानंतर वाजपेयींवर नाराज असलेले सुब्रमण्यम स्वामी हे पिक्चरमध्ये आले. त्यांनी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी आणि जयललिता यांची दिल्लीतील अशोका हॉटेलात भेट घडवून आणली. ही भेट चाय मिटींग म्हणून खूप गाजली. त्यानंतर जयललितांनी वाजपेयींचा पाठिंबा काढून घेतला आणि वाजपेयी सरकार अल्पमतात आलं.

17 एप्रिल रोजी संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपच्या नेत्यांची तारेवरची कसरक सुरू होती. त्याच्या एक दिवस आधी संसद भवनातून निघणाऱ्या वाजपेयींना बसपा सुप्रिमो मायावती भेटल्या. घाबरू नका. सर्व सुरळीत होईल, असं मायावतींनी वाजपेयींना सांगितलं. तेव्हा मायावतींकडे पाच खासदार होते. त्यांना आपल्याकडे खेचून आणण्यात प्रमोद महाजन आणि लालकृष्ण अडवाणी यशस्वी झाले होते. मतदानाच्या दिवशी आमचे खासदार संसदेत उपस्थित राहणार नाहीत असं मायावती म्हणाल्या होत्या. नॅशनल कॉन्फ्रन्सनेही वाजपेयींना पाठिंबा दिला होता.

पवार निती यशस्वी

बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी म्हणजे 17 एप्रिल रोजी सकाळी सकाळीच तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार यांनी मायावतींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि भाजपचे डावपेच उधळून लावले. त्या दिवशी संसदेत संपूर्ण दिवस भर चर्चा सुरू होती. त्यानंतर संध्याकाळी मतदानाची वेळ आली तेव्हा वाजपेयी या अग्निदिव्यातून बाहेर पडतील असंच सर्वांना वाटत होतं. मात्र, मतदानानंतर स्क्रीनवर जेव्हा मते दाखविण्यात आले, तेव्हा संसदच नव्हे तर संपूर्ण देश आश्चर्यचकीत झाला. तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांनी धीर गंभीर आवाजात मते जाहीर केली. आय 269, नो 270. केवळ एका मताने वाजपयेींचं सरकार पडलं.

अन् एका मताने सरकार कोसळलं

ज्या खासदाराच्या एका मताने वाजपेयींचं सरकार पडलं तो खासदार कोण होता? यावर तेव्हा खूप चर्चा रंगली होती. त्यावेळी ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरधर गमांग यांचं नाव पुढे आलं. त्यांनी सरकार पडण्याच्या दोन महिने आधीच म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला नव्हता. ते ओडिशाच्या कोरापूट लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यामुळे त्यांनीही मतदान प्रक्रियेत भाग घेतला आणि काँग्रेस खासदार असल्याने सरकारच्या विरोधात मतदान केलं. मात्र, काही राजकीय तज्ज्ञांच्या मते ते एक मत नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सैफुद्दीन सोज यांचं होतं. सोज यांनी पार्टीच्या व्हीपच्या विरोधात जाऊन एनडीएच्या विरोधात मतदान केल्याचं बोललं जातं. त्यामुळे फारूख अब्दुल्ला यांनी सोज यांना दुसऱ्या दिवशी पक्षातून काढून टाकले होते.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांचा व्यंगचित्राद्वारे भाजपला टोला, पुनम महाजनांकडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर

Video : “जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा, युपी मे का बा?” उत्तर प्रदेशातील व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

BUDGET 2022 : तोच दिवस, तीच वेळ, अर्थसंकल्पाचं ब्रिटिश कनेक्शन; वाचा रंजक माहिती

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.