
१ - आधी सायंकाळी ५ वाजता बजेट सादर व्हायचे: ब्रिटीशकाळात सायंकाळी ५ वाजता बजेट सादर केले जायचे. कारण भारतात सायंकाळी ५ वाजले असताना लंडनमध्ये सकाळचे ११.३० वाजलेले असतात. ही परंपरा स्वातंत्र्यानंतरही १९९९ पर्यंत चालली होती. त्यानंतर भाजपा सरकारने साल २००१ मध्ये यशवंत सिन्हा यांनी याची वेळ सकाळी ११ वाजता केली.

२ - बजेट बंकर परंपरा : साल १९५० च्या आधी बजेट राष्ट्रपती भवनात छापले जायचे. याच वर्षी बजेट लिक झाले. तेव्हापासून बजेटची प्रिटींग नॉर्थ ब्लॉकच्या एका बेसमेंटमध्ये एका गुप्त बंकरमध्ये होते. बजेटमध्ये सामील सुमारे १०० लोकांना ८ ते १० दिवस आधीच येथे लॉक इन केले जाते. त्यांच्याकडे मोबाईल, इंटरनेट किंवा बाहेरील कोणताही संपर्क नसतो.बजेट गुप्त ठेवण्यासाठी आजही हा पायंडा आहे.

३ - हलवा सेरेमनी : तुम्हाला वाटत असले की बजेटच्या आधी हलवा ( शिरा ) का बनवला जात असेल. ही भारतीय परंपरेतील शुभ कार्याची सुरुवात गोड पदार्थाने करण्याची रित आहे. या परंपरेत केवळ कोरोना काळात व्यत्यय आला. यावेळी बजेट प्रिंटींग सुरु होण्याच्या आधी अर्थ मंत्रालय मोठ्या कढईत हलवा तयार करतात. अर्थमंत्री स्वत: यास सर्व्ह करतात आणि संपूर्ण टीम याचे सेवन करते.

४ - सर्वात छोटे बजेट : जे लोक अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे बजेटचे भाषण ऐकतात त्यांना अंदाज नसेल की आज जरी 400-500 पानांचे बजेट जारी होत असेल एकदा हे बजेट ८०० शब्दांचे होते. साल १९७७ मध्ये अंतरिम अर्थमंत्री हीरूभाई एम. पटेल यांनी केवळ ८०० शब्दात बजेट जारी केले होते.ते केवळ आऊटले ( अंदाजित खर्च ) वाचून शांत झाले. तर सर्वात मोठे बजेट निर्मला सीतारमन यांनी साल २०२० मध्ये २ तास ४२ मिनिटांचे सादर केले होते.

५ - अनोखे टॅक्स : स्वातंत्र्यानंतरही १० वर्षे भारतीय नागरिकांवर विचित्र टॅक्स लावले जात होते. उदा. क्रॉसवर्ड, पजल वा कॉम्पिटिशनमध्ये जिंकलेल्या पुरस्कारावर, गिफ्ट टॅक्स, खर्च केल्यावर कर, सध्या यावर खूप बदल केलेला आहे. परंतू आजही गिफ्ट आणि मोठा खर्च केल्यास टॅक्स लावला जातो.

६ - २०१८ पर्यंत ब्रिटिश नियम : साल २०१८ पर्यंत भारतीय बजेट काळ्या वा लाल ब्रिफकेसमध्ये यायचे. जी ब्रिटीशांच्या ग्लॅडस्टोन बॉक्सची कॉपी होती. साल २०१९मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही वसाहतवादी परंपरा त्यागुन लाल रंगाच्या पारंपारिक वहि-खात्याचा वापर सुरु केला.

७ - इंग्रज नागरिकाने सादर केले बजेट : भारताचे पहिले बजेट ७ एप्रिल, १८६० रोजी सादर केले गेले होते. तेव्हा इंग्रजांचे राज्य होते. याचा हेतू १८५७ च्या क्रांतीनंतर इंग्रजी खजाना वाढवणे होता. तेव्हा या बजेटला इस्ट इंडिया कंपनीच्या वतीने स्कॉटलँड यार्डचे नागरिक जेम्स विल्स यांनी सादर केले होते. यात भारतीय नागरिकांवर कर लावण्यात आला.

८ - मुस्लीम नेत्याने सादर केले भारताचे बजेट : स्वातंत्र्याआधी भारताचे बजेट लियाकत अली खान यांनी 'गरीब आदमी का बजेट' नावाने सादर केले होते. ज्यात श्रीमंतांवर कर लावण्यात आले होते. स्वांतत्र्यावेळी फाळणी होऊन लियाकत अली खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.

९ - पीएमने सादर केले बजेट : भारताच्या इतिहासात अशा तीन घटना घडल्या ज्यावेळी अर्थमंत्र्यांच्या ऐवजी पंतप्रधानांनी बजेट सादर केले. आधी १९५८ मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरु यांनी बजेट सादर केले.यानंतर साल १९७० मध्ये मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधानांनी बजेट सादर केले.

१० - रेल्वे बजेटची समाप्ती : आधी रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर केले जायचे. ही परंपरा ९२ वर्षांपर्यंत सुरु होती. याची सुरुवात साल १९२४ मध्ये झाली होती. आणि २०१७ मध्ये यास समाप्त करुन सर्वसाधारण बजेटसोबत हे मर्ज करण्यात आले. तेव्हा तत्कालिन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटला सर्वसाधारण बजेटमध्ये मर्ज केले होते.