
अभिनेते नागार्जुन अक्किनेनीने मोठा जलवा साऊथ चित्रपटांमध्ये दाखवला आहे. फक्त साऊथ चित्रपटच नाही तर बॉलिवूडमध्येही मोठा धमाका केलाय.

नागार्जुन 65 वर्षांचे उद्या होतील. नागार्जुन यांचे खासगी आयुष्य हे कायमच चर्चेत राहिलेले आहे. नागार्जुनचे दोन लग्न झाले आहेत.

दोन लग्नानंतरही नागार्जुन हे एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडले. तब्बल 10 वर्ष यांनी एकमेकांना डेट केले. त्यानंतर हे दोघे विभक्त झाले.

विशेष म्हणजे आजही ती अभिनेत्री एकटीच जीवन जगते, तिने लग्नच केले नाहीये. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून तब्बू आहे.

अफेअरच्या चर्चांवर कधीच नागार्जुन किंवा तब्बू यांनी भाष्य केले नाहीये. नागार्जुन दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देण्यास तयार नसल्याने यांचे ब्रेकअप झाले. तब्बू नागार्जुनपेक्षा 13 वर्षाने लहान होती.