
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. शाहरुखची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे शाहरुखने यश चोप्रा यांच्यासोबत अनेक चित्रपट केले.

काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यश चोप्रा यांनी शाहरुख खान याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला होता. हेच नाही तर शाहरुख खान म्हणेल त्या फीसमध्ये काम करण्यास तयार असल्याचेही यश चोप्रा यांनी म्हटले.

शाहरुख खान याच्याबद्दल बोलताना यश चोप्रा यांनी म्हटले होते की, एकदा चित्रपटाच्या सेटवरून काही वेळासाठी शाहरुख खान हा गायब झाला होता.

त्यानंतर काही वेळात तो परत आला. मात्र, मी त्याला चांगलाच ओरडलो होतो. मात्र, त्याने मला त्याच्या स्टाईलने उत्तर दिले. आता यश चोप्रा यांच्या या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे.

शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे त्याचा हा चित्रपट धमाका करताना देखील दिसला.