बारामतीत शरद पवार – अजित पवार एकत्र; एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं

बारामतीतल्या एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र आले. परंतु यावेळी त्यांनी एकमेकांसोबत बसणं टाळलं आहे. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

Updated on: Jun 29, 2025 | 1:39 PM
1 / 5
बारामतीत एका उद्धाटनाच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम होता. याच कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले.

2 / 5
बारामतीत उद्धाटनाच्या कार्यक्रमात जरी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असले तरी त्यांनी या कार्यक्रमात एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं. यावेळी शरद पवार आणि अजित पवार एक खुर्ची सोडून बसले.

3 / 5
टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन प्रोजेक्टचा उद्घाटन कार्यक्रम शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रोजेक्ट अंतर्गत व्हर्चुअल रिअॅलिटी, रोबोटिक्स लॅब, सायन्स ऑन स्पिअर, होलोग्राम टेक्नॉलॉजीचा वापर असे नावीन्यपूर्ण विविध डेमोन्स्ट्रेशन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ते विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत.

4 / 5
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती इथल्या सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर (सायन्स पार्क) याची राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, मुंबई यांच्यामार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टेक्नॉलॉजी डेमोस्ट्रेशन प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे.

5 / 5
प्रायोगिक तत्त्वावर सर्वप्रथम हे तंत्रज्ञान राज्यात आणलं आहे. त्यामुळे राज्यातील इतर पाच सायन्स सेंटर्सना हे प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे.