माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या संकल्पनेतून अनिल काळे यांनी ही रांगोळी रेखाटली आहे. (akola 20 feet rangoli design)
Follow us
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी येथे एका रांगोळी कलाकाराने दसऱ्यानिमित्त 20 फुटांची रांगोळी रेखाटली आहे. अनिल काळे असे या रांगोळी कलाकाराचे नाव आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या संकल्पनेतून अनिल काळे यांनी श्री संत चतर्भुज नवदुर्गा मंदिरात ही रांगोळी रेखाटली आहे.
यात देवीच्या रुपात डॉक्टर तर मानवाच्या रुपात एक रुग्ण दिसत आहे. त्याशिवाय पोलीस प्रशासन आणि शासन रात्रंदिवस जनतेला हात जोडून विनंती करताना दिसत आहे.
कोरोनाच्या सद्यस्थितीवर ही रांगोळी रेखाटण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
अनिल काळे यांना ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले आहेत. सध्या ही रांगोळी गावामध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहे.
पोलीस प्रशासनाकडूनही या रांगोळीचे कौतुक केले जात आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना घरोघरी राबवावी, असा संदेशही या रांगोळीतून देण्यात आला आहे.