कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा !
कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते.

कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. ‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो.
- कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. ‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो.
- कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे.
- कोरफडीच्या औषधी गुणांमुळे खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडचा वापर केला जातो.
- कोरफडीत मुबलक प्रमाणात ‘ई’ जीवनसत्व आढळते. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती औषध ठरते.
- कोरफडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्वचा कोरडी पडते अशावेळी कोरफड जेलचा वापर मॉइश्चरायजरसारखा करू शकता.





