
बॉलिवूडमधील लोकप्रिय कुटुंब म्हणजे बच्चन फॅमिली... अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब केवळ चित्रपटांद्वारे अभिनयातच आपला ठसा उमटवत नाही तर त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रातही प्रभुत्व मिळवले आहे. याचं कारण म्हणजे त्यांचं शिक्षण. बच्चन कुटुंबीय बरेच शिकलेले आहत. काहींनी बी.एस्सी. तर काहींनी एम.बी.ए. पदवी मिळवली आहे. बच्चन कुटुंबाच्या शिक्षणावर नजर टाकूया... (photos : Social Media)

महानायक अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 साली अलाहाबाद येथे झाला. तेजी बच्चन आणि हरिवंश राय बच्चन यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. सध्या 82 वर्षांचे असलेले अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात दिग्गज अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.

अमिताभ बच्चन यांचे हायस्कूल शिक्षण अलाहाबादच्या बॉईज हायस्कूलमध्ये झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवुड कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर, अमिताभ यांनी 1962 साली दिल्लीतील किरोरीमल कॉलेजमधून विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली.

'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये त्यांनी एकदा सांगितले होते की, बारावीत विज्ञान विषयात चांगले गुण पाहून त्यांनी विचार न करता बी.एससी. मध्ये प्रवेश घेतला पण भौतिकशास्त्रात ते नापास झाले.

अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन बद्दल सांगायचं झालं तर बोलायचे झाले तर, मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलनंतर त्याने बोस्टन विद्यापीठात बिझनेस कोर्समध्ये प्रवेश घेतला, परंतु पदवी पूर्ण केली नाही. तोही नामवंत अभिनेता आहे.

बच्चन कुटुंबाची सूनबाई, ऐश्वर्या राय ही देखील प्रतिभावान अभिनेत्री असून तिचे लाखो चाहते आहेत. ऐश्वर्या रायने मुंबईतील रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये, आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले, परंतु मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द करण्यासाठी तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले.

अमिताभ बच्चन यांची लाडकी मुलगी श्वेता बच्चन हिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री (MBA) मिळवली आहे.

अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेताची मुलगी नव्या नंदा हिने न्यू यॉर्कमधील फोर्डहॅम विद्यापीठातून डिजिटल तंत्रज्ञान आणि यूएक्स डिझाइनमध्ये पदवी प्राप्त केली आहे.