
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बॉलिवुडमध्ये वेगळे आणि मानाचे असे स्थान आहे. तब्बल पाच दशकं त्यांनी बॉलिवुडवर राज्य केलेलं आहे. त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय हे दोघेही बॉलिवुडमधील मोठे कलाकार आहेत. या दोघांनीही आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेले आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे 2007 साली विवाहबंधनात अडकले. या जोडीची आजही तेवढीच चर्चा होत होते. त्यांच्या लग्नाला आजघडीला 18 वर्षे पूर्ण झाले आहेत. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे लग्न होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला एक खास प्रश्न विचारला होता.

अमिताभ बच्चन यांनी 'मिड डे'शी बोलताना अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला. यावेळी बोलताना त्यांनी ऐश्वर्याला विचारलेल्या खास प्रश्नाबाबतही सांगितले. अभिषेक बच्चनने गुरु चित्रपटाच्या प्रिमियमनंतर लगेच ऐश्वर्या रायला प्रपोज केले होते.

ही बाब अमिताभ बच्चन यांना समजली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला घरी बोलावले. तिचे स्वागत केले आणि अभिषेकने तुला प्रपोज केले आहे. तू खुश आहेस का? असा प्रश्न केला. अमिताभ बच्चन यांच्या या प्रश्नावर मी आनंदी आहे, असे ऐश्वर्याने सांगितले आणि अभिषेकसोबत लग्न करण्यास होकार दिला.

त्यानंतर मलादेखील तू खुश हवी आहे, बाकी काहीही नाही, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला परवानगी दिली. दरम्यान, अभिषेक आणि आश्वर्या यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचे वृत्त पसरते. परंतु अजूनही ही जोडी अनेक ठिकाणी एकत्र दिसते. त्यांना एक मुलगीही आहे.